कोट्यातले प्रवेश ऑनलाईन होणार नाहीत !

  Mumbai
  कोट्यातले प्रवेश ऑनलाईन होणार नाहीत !
  मुंबई  -  

  जर तुम्ही अकरावीत प्रवेश घेताना अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन या कोट्यातून प्रवेश घेत असाल तर तुम्हाला ऑनलाईन प्रवेश घेता येणार नसल्याचे खुद्द शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे. काही विद्यार्थी कोट्यातून महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि ऑनलाईन प्रवेशामध्ये चांगले कॉलेज यायची वाट बघतात. मात्र आता विद्यार्थ्यांना तसे करता येणार नाही.

  गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थी कोट्यातून आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत होते. त्यामुळे 2 जागा एक विद्यार्थी अडवत होता. त्यामुळे ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे या वर्षापासून केवळ एकाच ठिकाणाहून प्रवेश अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांनी एका ठिकाणी अॅडमिशन घेतल्यास त्यांना महाविद्यालय बदलायची संधी देण्यात येणार नाही. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या चार फेऱ्यांमध्ये त्याला भाग घेता येणार नाही, असेही शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

  यावर्षी 30 जून रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत अस्पसंख्याक, इनहाऊस, आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या कोट्यातून प्रवेश निश्चित होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.