Advertisement

एफवाय प्रवेशाची दुसरी यादी जाहीर


एफवाय प्रवेशाची दुसरी यादी जाहीर
SHARES

एफवायच्या प्रवेशासाठी सध्या विद्यार्थ्यांची चांगलीच खटपट सुरू आहे. त्यातच पहिल्या यादीने 90 टक्के पार केलेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच दुसऱ्या यादीची प्रतीक्षा होती. बुधवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत कॉमर्स आणि आर्टसचा कट ऑफ 2-3 टक्क्यांनी खाली घसरला. विज्ञान शाखेचा कट ऑफ हा सर्वात खाली आला आहे. 

दुसरी यादी लागूनही टक्क्यांत जास्त फरक न पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच आली आहे. अनेक नामांकित कॉलेजमध्ये कॉमर्सचा कट ऑफ हा नव्वदी पारच होता.

दुसऱ्या यादीनंतर अनेक नामांकित कॉलेजमधील प्रवेश बंद झाले आहेत. त्यामुळे 70 ते 80 टक्यांमधील विद्यार्थ्यांना नामांकीत कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. तर, त्यांना इतर कॉलेजच्या तिसऱ्या यादीची वाट बघावी लागणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालानंतर नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू होती. मात्र पहिली यादी 90 टक्क्यांवर आणि दुसरी यादी 80 टक्क्यांवर लागल्यामुळे  मुलांची निराशा झाली आहे.

पण आता कॉलजच्या तिसऱ्या यादीत तरी नाव लागते का? याकडे विद्यार्थ्यांचे सध्या लक्ष आहे. 



मुंबईच्या नामांकित कॉलेजची दुसरी गुणवत्ता यादी :


रुईया कॉलेज
टक्केवारी
बीएमएस
76
बीएमएस (कॉम्प्युटर सायन्स)
76.54
बीएससी (बायोटेक)
85
बीए
90
आर्ट्स
87.89
कॉमर्स
88.46
सायन्स
87


साठ्ये कॉलेज
टक्केवारी
बीए
प्रवेश बंद
बी. कॉम
79.5
बीएससी
64
बीएमएम
83.83



सोमय्या कॉलेज
टक्केवारी
बीएससी
72
बीएससी (कम्प्युटर सायन्स)
80.15
बी. कॉम
87
बीएफएम
77
बीएएस
90.17


पोद्दार कॉलेज
टक्केवारी
आर्ट्स (कला)
80
कॉमर्स
91.80
सायन्स
80.31


मिठीबाई कॉलेज
टक्केवारी
बी. कॉम
89.17
बीएफएम
92.6
बीबीआय
88.6
आर्ट्स
90.8
सायन्स
89
कॉमर्स
92.6


रुपारेल कॉलेज
टक्केवारी
बीए
94.16
बी. कॉम
87.5
बीएससी (कॉम्प्युटर सायन्स)
71.66
बीएससी
84.8
आर्ट्स
58.33
कॉमर्स
91
सायन्स
82




हे देखील वाचा - 

मुंबई विद्यापीठात एफवाय प्रवेशाची जोरदार नोंदणी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा