एफवाय प्रवेशाची पहिली यादी जाहीर

 Mumbai
एफवाय प्रवेशाची पहिली यादी जाहीर
Mumbai  -  

एफवाय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली. मुंबईतील नामांकित कॉलेजसमधील कटऑफ लिस्ट 80 ते 90 टक्क्यांदरम्यान असल्याने यादीत नाव झळकलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी तयारी सुरू केली आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने एफवाय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार यंदाही प्रवेशासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणी प्रक्रिया अनिवार्य केली होती.

ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया 3 लाख 31 हजार 912 विद्यार्थ्यांनी पूर्ण केली आहे. वेळापत्रकानुसार 21 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे 23 ते 28 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.


मुंबईच्या नामांकित कॉलेजची पहिली गुणवत्ता यादी :


रूईया कॉलेज
व्ही. जे. वझे कॉलेज
मिठीबाई कॉलेज
डहाणूकर कॉलेज
एफवाय बीएससी - 81%
एफवाय बीएससी - 76.15%
एफवाय बीकॉम - 90%
बीएएफ - 82.15%
एफवाय बीए -
एफवाय बीकॉम - 89.54%
एफवाय बीए - 94.8%
बीबीआय - 78.46%
इंग्रजी माध्यम - 93 %
एफवाय बीए - 84.77%

कॉमर्स - 82.00%
मराठी माध्यम - 60%


सायन्स - 66.46%
एफवाय बीएमएम (इंग्रजी)


आर्ट्स - 62.62%
आर्ट्स - 89.50%


बीएफएम - 74.00%
कॉमर्स - 90 %सायन्स - 90.40%
मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच, जर्मन स्टडी) बीकॉम, बीएससी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएससी (नॉटिकल सायन्स, होम सायन्स, एव्हिएशन, फोरेन्सिक सायन्स, हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अँड आय, ए अँड एफ, एफ अँड एम), बीएमएस, बिव्होक, लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व नोंदणी करण्यात आली.


हे देखील वाचा -  

लो शुरु हो गई रेस! प्रवेश नक्की मिळणार कुठे?


Loading Comments