Advertisement

लो शुरु हो गई रेस! प्रवेश नक्की मिळणार कुठे?


लो शुरु हो गई रेस! प्रवेश नक्की मिळणार कुठे?
SHARES

राज्य शिक्षण मंडळा(एसएससी)ने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत 100 टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्याने यंदा 'एसएससी', 'आयसीएससी' आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) विद्यार्थ्यांमध्ये अकरावीत प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

प्रात्याक्षिक आणि प्रकल्प आधारीत शिक्षणपद्धतीच्या जोरावर 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या 'आयसीएसई' आणि 'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांमुळे 'एसएससी'च्या विद्यार्थ्यांना कटऑफमध्ये स्थान मिळवणे नेहमीच कठीण जाते. मात्र यंदा 'एसएससी'च्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या 100 टक्के गुणांमुळे अकरावी प्रवेशाच्या कटऑफमधील रंगत वाढणार आहे.

यंदा 'एसएससी'च्या दहावीच्या निकालात 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या कमी झाली असली, तरी 70 ते 80 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना मुंबईतील नामवंत महाविद्यालयांत प्रवेश घेताना बसू शकतो. कारण 'सीबीएसई' आणि 'आयसीएससी' परीक्षेत 90 पेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 'एसएससी'च्या विद्यार्थ्यांना रुईया, रुपारेल, साठ्ये, सेंट झेवियर्स, पोद्दार, सोमय्या आशा नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी काँटे की टक्कर द्यावी लागणार आहे.

या वर्षी तिन्ही बोर्डातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेताना त्रास होईल, असे मी म्हणणार नाही. अट फक्त एवढीच की, विद्यार्थ्याने अमुक एका महाविद्यालयातच प्रवेश हवा, असा अट्टाहास करू नये. विद्यार्थ्यांनी शक्यतो घराजवळील महाविद्यालय निवडावे. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल एवढ्या जागा उपलब्ध आहेत.
- कविता रेगे, प्राचार्य, साठ्ये महाविद्यालय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा