मुंबई विद्यापीठात एफवाय प्रवेशाची जोरदार नोंदणी!

 Kalina
मुंबई विद्यापीठात एफवाय प्रवेशाची जोरदार नोंदणी!
Kalina, Mumbai  -  

मुंबई विद्यापीठात एफवायच्या प्रवेशासाठी 1 लाख 99 हजार 943 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच, जर्मन स्टडी) बी कॉम, बीएससी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएससी (नॉटिकल सायन्स, होम सायन्स, एव्हिएशन, फोरेन्सिक सायन्स, हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अँड आय, ए अँड एफ, एफ अँड एम), बीएमएस, बिव्होक, लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.

रविवारी अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षासाठी नोंदणी केली. आतापर्यंत एफवायच्या प्रवेशासाठी 1 लाख 99 हजार 943 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती विद्यापीठातील जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बनसोडे यांनी दिली. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने mum.digitaluniversity.ac ही वेबसाईट सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शंका असल्यास त्यांनी 9326552525 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Loading Comments