बॉलिवूडमध्ये 'पिगी चॉप्स' या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. ती कोणत्याही शो मध्ये दिसली की त्याची चर्चा होते. रविवारी अमेरिकेत झालेल्या अॅमी अॅवॉर्ड्स सोहळ्यातही प्रियंका सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. यावेळी तिची कोणत्याही पुरस्कारासाठी निवड झाली नव्हती, तरीही सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. पण या अवॉर्ड शो मध्ये असे काही झाले की ज्यामुळे प्रियंका अपसेट झाली.
रविवारी झालेल्या ६९ व्या अॅमी अवॉर्ड्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रियंकाने पांढऱ्या रंगाचा फिदर्स ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती भलतीच खुलून दिसत होती. या पुरस्कार सोहळ्यात प्रियंकाने हॉलिवूड अभिनेता अँथनी अँडरसन याच्या सोबत आऊटस्टँडिंग व्हरायटी टॉक सिरीजसाठी जॉन ओलिव्हरलाही पुरस्कार दिला.
पण, याचदरम्यान निवेदकानं तिचं नाव प्रियांका चोप्रा ऐवजी प्रियांका चोपा असं घेतलं. हे ऐकून ती थोडीशी नाराज झाली. पण तिच्या चाहत्यांनी मात्र अॅमी अवॉर्ड्सवाल्यांचा चांगलाच समाचार घेतला.
प्रियंकाच्या या स्टायलिश लूकची आंतरराष्ट्रीय मीडियामध्येही चांगलीच चर्चा झाली. काही वेबसाईट्सने तिच्या या लूकला बेस्ट १० मध्ये स्थान दिले आहे. २०१६ मध्ये झालेल्या अॅमी अॅवॉर्ड सोहळ्यातही ती अॅवॉर्ड देण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने लिमिटेड सीरीज, मुव्ही आणि ड्रामॅटिक स्पेशल अॅवॉर्डच्या कॅटेगरीतल्या आऊटस्टँडिंग डायरेक्शनसाठी अॅवॉर्ड दिला होता.
'क्वांटिको' या टीव्ही मालिकेनंतर प्रियंकाने हॉलीवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. 'क्वांटिको' या मालिकेसाठी तिला फेव्हरेट ड्रामॅटिक टीव्ही कलाकारचा पीपल चॉईस पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा -
कंगना आणि आदित्यच्या 'त्या रात्री'ची कहाणी प्रत्यक्षदर्शीच्या जुबानी
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)