प्रियांकाला दुसऱ्यांदा पीपल्स चॉईस अवॉर्ड

Pali Hill
प्रियांकाला दुसऱ्यांदा पीपल्स चॉईस अवॉर्ड
प्रियांकाला दुसऱ्यांदा पीपल्स चॉईस अवॉर्ड
See all
मुंबई  -  

मुंबई - प्रियांका हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात नावाजली जात आहे. ‘क्वांटिको’ या सिरीजमुळे प्रियांका चोप्रा हे नाव अमेरिकेतील घराघरात पोहोचले आणि या ‘देसी गर्ल’च्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली. ‘क्वांटिको’ या मालिकेची लोकप्रियता पाहता प्रियांकाला नुकतेच पीपल्स चॉईस अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

प्रियांकाने दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळवला असून तिने या पुरस्कारासाठीच्या शर्यतीत अॅलेन पॉम्पेओ, केरी वॉशिंग्टन, ताराजी पी. हॅन्सन, विओला डेविस या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. पीपल्स चॉईस अवॉर्ड्स २०१७ या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांकाला ‘फेव्हरिट ड्रामॅटिक टिव्ही अॅक्ट्रेस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रियांका म्हणली, ‘मी एक ड्रामा क्वीन असल्याचा मला आनंदच होत आहे. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. या पुरस्कारासाठीच्या या शर्यतीत ज्या अभिनेत्रींना नामांकन मिळाले होते त्या सर्व उत्तम अभिनेत्री आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.