#MeToo: माझ्यावरील अारोप खोटे, नाना पाटेकरांचं सिन्टाला उत्तर

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा अारोप केल्याची दखल 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट' असोसिएशन (सिन्टा) नं गंभीरपणे घेतली अाहे. याबाबत सिन्टाने नाना पाटेकरांना नोटीस पाठवली होती. या नोटिशीला नानांनी उत्तर दिलं अाहे. माझ्यावरील अारोप खोटे असून ते चुकीचे अाहेत, असं नानांनी नोटिशीच्या उत्तरात स्पष्ट केलं अाहे. 

चळवळ सुरू 

२००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी अापल्याशी गैरवर्तन केले असा अारोप तनुश्रीने केला होता. या अारोपानंतर बाॅलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली. तनुश्रीच्या या अारोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळ सुरू झाली. तनुश्रीने गणेश आचार्य, चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता यांची नार्को व ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची मागणी केली अाहे. 

तनुश्रीवर कायदेशीर कारवाई 

बाॅलीवूडमध्ये #MeToo चळवळीत अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, निर्माते व अभिनेत्यांवर  लैंगिक छळाचे आरोप केले अाहेत. याची गंभीर दखल घेत सिन्टाने संबंधितांना नोटीस पाठवली होती. नानांनी या नोटिशीला उत्तर देत हे अारोप फेटाळले अाहेत. माझी बदनामी करणारे हे अारोप असून तनुश्रीविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं नानांनी या नोटिशीच्या उत्तरात म्हटलं अाहे. 


हेही वाचा - 

#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!

विजयादशमीच्या मुहूर्तावर 'श्री स्वामी समर्थ' चित्रपटाची घोषणा


पुढील बातमी
इतर बातम्या