Advertisement

विजयादशमीच्या मुहूर्तावर 'श्री स्वामी समर्थ' चित्रपटाची घोषणा

स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होत असल्यामुळे, स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावरदेखील आपल्याला पाहता येणार आहे.

विजयादशमीच्या मुहूर्तावर 'श्री स्वामी समर्थ' चित्रपटाची घोषणा
SHARES

'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..' हे केवळ वाक्य उच्चारलं तरी लगेच स्वामी समर्थांचं रुप नजरेसमोर दिसू लागतं. मनाला धीर देणारं त्यांचं हे वाक्य जगण्याला नवी उर्जा मिळवून देतं. आता हेच स्वामी आपल्या भक्तानां रूपेरी पडद्यावर दर्शन देणार आहेत. स्वामींवर आधारित असलेल्या नवीन चित्रपटाची घोषणा दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आली.


समर्थांच्या जीवनावर सिनेमा 

स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होत असल्यामुळे, स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावरदेखील आपल्याला पाहता येणार आहे. कारण, स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लवकरच एक घेऊन येत आहेत. 'श्री स्वामी समर्थ' असं या सिनेमाचं शीर्षक आहे.


दादरच्या मठात कार्यक्रम

दादरच्या प्रसिद्ध स्वामी समर्थांच्या मठात दसऱ्याच्या दिवशी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतले स्वामीभक्त कलाकार अंकुश चौधरी, सतीश पुळेकर आणि किशोरी अंबिये यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. याप्रसंगी अंकुश आणि सतीश पुळेकर यानी सिनेमाला शुभेच्छा दिल्या.


दिग्गज कलाकार

पर्व क्रिएशन्स निर्मिती 'श्री स्वामी समर्थ' या सिनेमाचं लिखाण दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनीच केलं असून, या सिनेमातील स्वामी समर्थांच्या भूमिकेविषयी काहीच रिवील करण्यात आलं नाही. स्वामींच्या महत्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडीशन घेतली जाणार असल्याचं कळतं. शिवाय या सिनेमात मराठीतील दिग्गज कलाकारांचीदेखील भूमिका असणार आहे.



हेही वाचा - 

रुपेरी पडद्यावर ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’

‘माझा अगडबम’चं संगीत प्रकाशन सोहळ्यात नाजुका-रेहमानची भेट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा