Advertisement

‘माझा अगडबम’चं संगीत प्रकाशन सोहळ्यात नाजुका-रेहमानची भेट


‘माझा अगडबम’चं संगीत प्रकाशन सोहळ्यात नाजुका-रेहमानची भेट
SHARES

आॅस्करसोबतच जागतिक पातळीवरील बऱ्याच मानाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरणारे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या हस्ते ‘माझा अगडबम’ या मराठी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या मंचावर रेहमान यांची ३०० किलोंच्या ‘अगडबम’ नाजूकाशी भेट झाली.



मराठीसाठी संस्मरणीय 

टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्कर विजेते ए. आर. रेहमान यांनी नुकत्याच एका खास कारणास्तव मुंबईत हजेरी लावली होती. हे खास कारण म्हणजे, पेन इंडिया कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या ‘माझा अगडबम’ सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा! मुंबईतील ताज लॅन्डस् एंड हॉटेलमध्ये पार पडलेला हा संगीत सोहळा रेहमान यांच्या उपस्थितीमुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी संस्मरणीय ठरला.


ग्रेट भेट

‘माझा अगडबम’ सिनेमाचे संगीत दिग्दर्शक तसंच निर्माते टी. सतीश चक्रवर्ती यांना शुभेच्छा देण्यासाठी रेहमान यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकांना रेहमान आणि चक्रवर्ती यांच्यातील गुरु-शिष्य नात्याची प्रेरणादायी अनुभूती घेता आली. तसंच, महाराष्ट्राची लाडकी नाजुका आणि रेहमान यांची झालेली ग्रेट भेट देखील रंजक ठरली.


तामिळ गाणं मराठीत

तृप्ती भोईर लिखित आणि दिग्दर्शित ‘माझा अगडबम’ चित्रपटाच्या या संगीत प्रकाशन सोहळ्याला भाजपा प्रवक्त्या शायना एन. सी. देखील उपस्थित होत्या. रेहमान यांच्या सांगितीक तालमीत तयार झालेले चक्रवर्ती यांनी रेहमान यांच्या गाजलेल्या तामिळ गाण्याचं मराठीत सादरीकरण करत, त्यांचं अनोख्या शैलीत स्वागत केलं. शिवाय त्यांच्यासोबत केलेल्या कामाच्या काही गोड आठवणीदेखील शेअर केल्या. रेहमान यांनीही चक्रवर्ती यांचं कौतुक करत, आपल्याला मराठी संस्कृती आणि भाषा आवडत असल्याच सांगितलं. त्यामुळे जेव्हा सतीश मराठीत एक मोठा प्रोजेक्ट करतो असं कळलं, तेव्हा मला खूप आनंद झाल्याचंही रेहमान म्हणाले.


गाणं प्रदर्शित

या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांना ‘माझा अगडबम’मधील ‘प्रीती सुमने...’ या रॉमेंटिक गाण्याचा आस्वाद लुटता आला. आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं या चित्रपटातील ‘हळुवारा हलके...’ हे भावनिक गाणंदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आलं. गायिका श्रेया घोषालच्या दर्दी आवाजात सादर झालेले हे गाणं प्रेक्षकांना भावूक करणारं आहे. मंगेश कांगणे लिखित या गाण्याला चक्रवर्ती यांनी चाल दिली असून, नाजूकावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

निवेदिताच्या क्लॅपने ‘प्रवास’ चित्रपटाचा मुहूर्त

वैशाली माडेच्या आवाजात येणार ‘डीजेवाला दादा’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा