Advertisement

निवेदिताच्या क्लॅपने ‘प्रवास’ चित्रपटाचा मुहूर्त

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘अण्णा’ या हिंदी चित्रपटानंतर अभिनेता-दिग्दर्शक शशांक उदापूरकर मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. शशांकच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षक ‘प्रवास’ आहे.

निवेदिताच्या क्लॅपने ‘प्रवास’ चित्रपटाचा मुहूर्त
SHARES

‘प्रवास’ आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा ‘प्रवास’ प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवत असतो आणि त्यासोबतच अनुभवसंपन्नही करत असतो. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला. निवेदिता सराफ यांनी मुहर्ताचा क्लॅप दिला.  


शशांक उदापूरकर दिग्दर्शक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘अण्णा’ या हिंदी चित्रपटानंतर अभिनेता-दिग्दर्शक शशांक उदापूरकर मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. शशांकच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षक ‘प्रवास’ आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे, विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदी कलाकार यात असणार आहेत.

मराठीत काम करण्याचा अानंद

५० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एका वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करतानाच  हा ‘प्रवास’ प्रेक्षकांनाही एक वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केला. ‘प्रवास’च्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद पद्मिनी कोल्हापूरे यांनी व्यक्त केला. ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं सांगणारा हा ‘प्रवास’ माझ्यासाठीही तितकाच महत्त्वपूर्ण असून माझ्या या दिग्दर्शकीय प्रवासात दिग्ग्जांची मला मिळालेली साथ मला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास शशांकने व्यक्त केला.


गुरु ठाकूरांचं गीतलेखन

लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होणार आहे. ओम छंगानी फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं लेखनही शशांकनेच केलं आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचं आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम-सुलेमान यांचा मराठी चित्रपटसृष्टीतला ‘प्रवास’ या निमित्ताने सुरु झाला आहे. गीतलेखन गुरु ठाकूरने केलं आहे. कलादिग्दर्शन महेश साळगांवकर, तर संकलन संजय सांकला यांचं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले देणार आहेत. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची आहे.



हेही वाचा -

वैशाली माडेच्या आवाजात येणार ‘डीजेवाला दादा’

#MeeToo मुळे खलनायकांचा ‘थरथराट’!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा