Advertisement

रुपेरी पडद्यावर ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’

निसर्गरम्य माथेरानमध्ये राहणारा घोडेस्वार बाबू पवार, त्याची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या सिनेमातून पहायला मिळणार आहे.

रुपेरी पडद्यावर ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’
SHARES

‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ म्हटलं की, लगेच तोंडाला पाणी सुटतं... पण जरा थांबा...! कारण ही काही आईस्क्रीमची फ्लेवर्स नाहीत तर हे आहे आगामी मराठी सिनेमाचं शीर्षक..!! होय... ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ नावाचा एक गोड सिनेमा १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर तुम्ही मराठीत अनेक प्रेमकथा पहिल्या असतील ही पण ही कथा इतरांपेक्षा वेगळी आहे. ही देखील एक प्रेमकथाच आहे. पण दोन व्यक्तींमधील नव्हे तर एका मुलीची तिच्या लाडक्या ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची.


माथेरानमध्ये चित्रीकरण

निसर्गरम्य माथेरानमध्ये राहणारा घोडेस्वार बाबू पवार, त्याची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या सिनेमातून पहायला मिळणार आहे. अआइई एन्टरटेंन्मेंट निर्मित ‘व्हॅनिला  स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण झालेला ‘व्हॅनिला  स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा पहिलाच चित्रपट आहे.


जानकी पाठकचं पदार्पण 

‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ या सिनेमाद्वारे जानकी पाठक ही नवोदित अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. यासोबत ज्येष्ठ अभिनेते रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव आदी कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाचं संकलन सागर भाटिया यांनी, तर छायांकन सचिन खामकर यांनी केलं आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांनी दिलं असून, जावेद अली, उपग्ना पंड्या, ऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.



हेही वाचा-

‘माझा अगडबम’चं संगीत प्रकाशन सोहळ्यात नाजुका-रेहमानची भेट 

निवेदिताच्या क्लॅपने ‘प्रवास’ चित्रपटाचा मुहूर्त




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा