मुंबईत १७ जूनला मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • पर्यावरण

जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या पावसामुळं उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला खरा. मात्र दुसऱ्या आठवड्यात पावसानं दांडी मारल्यानं उन्हामुळे मुंबईकरांची पुन्हा लाही-लाही होत आहे. मात्र भारतीय हवामान विभागानं (आयएमडी) मुंबईत १७ जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा गारव्यासह मनसोक्त भिजण्याचा अनुभव घेता येणार आहे.

१७, १८ जूनला मुसळधार

मुंबईत ९ जून रोजी चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसानं दडी मारली. मात्र मुंबईसह कोकणपट्ट्यात १७ आणि १८ जूनला मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज शुक्रवारी आयएमडीनं व्यक्त केला. यासह कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेनं मुंबईसह उपनगरांमध्ये चांगला पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी वातावरणातली आर्द्रता वाढल्याचीही नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही वेधशाळांनी केली.


हेही वाचा - 

मुंबईत पावसाचा जोर ओसरणार

मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईड

पुढील बातमी
इतर बातम्या