SHARE

मुंबईत 9 ते 11 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्या (आयएमडी)ने दिली आहे. पुढील काही दिवसापर्यंत मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज रविवारी आयएमडीने व्यक्त केला आहे. त्यामुळे काही दिवस दिवस मुंबईत पाऊस साधारण राहणार आहे.


हवामान खात्याची माहिती

मुंबईत मान्सूनचा प्रवाह कमी झाला आहे. अाता पाऊस सामान्य राहण्याची शक्यता असून येत्या काही दिवसापर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचं भारतीय हवामान खात्याचे अजय कुमार यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसापर्यंत पडलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची शनिवारी आणि रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिल्यानंतर मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या