Advertisement

मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईड


मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईड
SHARES

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच रिमझिम पाऊस पडत होता. पण आता पावसाचा जोर वाढला आहे. दादर, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर इथं सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. यासोबतच कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे. 8 ते 10 जून दरम्यान मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.



यंदाच्या पावसाळ्यात २४ दिवस हायटाईडचा धोका हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जाहीर केलीय. १३ जून ते १३ सप्टेंबर दरम्यान अरबी समुद्रात ४.९७ मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय.



जून महिन्यात सहा दिवस हायटाईड येणार आहे. १३ जून ते १८ जून असे सहा दिवस हायटाईडची स्थिती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर समुद्राजवळ जातात. पण या दिवशी मुंबईकरांनी समुद्र किनारी जाण्याचा धोका पत्करू नये. 

या दिवशी उसळणार उंच लाटा


दिवस तारीखवेळहाईट मीटर
बुधवार१३ जून २൦१८दुपारी ११ वाजून ४३ मिनिट४.६८ मीटर
गुरुवार १४ जून २൦१८दुपारी १२ वाजून ३० मिनिट४.८५ मीटर
शुक्रवार१५ जून २൦१८दुपारी १ वाजून १८ मिनिट४.९२  मीटर
शनिवार१६ जून २൦१८दुपारी २ वाजून ൦६ मिनिट४.९१ मीटर
रविवार१७ जून २൦१८दुपारी २ वाजून ५६ मिनिट४.८२ मीटर
सोमवार१८ जून २൦१८दुपारी ३ वाजून ४७ मिनिट४.६५ मीटर



हेही वाचा

मुंबईत पावसाची जोरदार एन्ट्री


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा