मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कारण मुंबईत जोरदार पावसाने एन्ट्री केली आहे. 7 ते 10 जूनला मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्याप्रमाणे मुंबईत गुरुवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस आल्यावर मुंबईत सर्व प्रथम रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ही परिस्थिती पाहता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं होतं.
मुंबईतल्या पावसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
गुरुवारी सकाळी मुंबईतल्या अनेक भागात जोरदार पावसाचं आगमन झालं. मात्र अजूनतरी या पावसाचा कोणताच परीणाम दिसून आलेला नाही. लोकल रेल्वे वेळेवर सुरू आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत 9 जूनला जोरदार पावसाची शक्यता आहे.
#MumbaiRain #MumbaiMonsoon The period between June 6th and June 12, could be the worse spell since 26 July 2005, when Mumbai recorded 900mm in a day.
— Jatin Singh (@JATINSKYMET) June 4, 2018
मुंबईत सोमवारी 3 जून रोजी पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या. पावसाच्या पहिल्याच सरीत मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जून दरम्यान पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्याने तो याआधीच्या पावसाचं विक्रम मोडणार, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
त्यामुळे नागरिकांनी समुद्राच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि गरज पडल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं होतं. यंदा 2005 प्रमाणे पूरस्थिती उद्भवणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
हेही वाचा