Advertisement

मुंबईत पावसाच्या जोरदार एन्ट्रीनं उकाड्यापासून दिलासा

मुंबईत जोरदार पावसाने एन्ट्री केली आहे. 7 ते 10 जूनला मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्याप्रमाणे मुंबईत गुरुवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून जोरदारा पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईत पावसाच्या जोरदार एन्ट्रीनं उकाड्यापासून दिलासा
SHARES

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कारण मुंबईत जोरदार पावसाने एन्ट्री केली आहे. 7 ते 10 जूनला मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्याप्रमाणे मुंबईत गुरुवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस आल्यावर मुंबईत सर्व प्रथम रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ही परिस्थिती पाहता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं होतं.


मुंबईतल्या पावसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत जोरदार पाऊस

गुरुवारी सकाळी मुंबईतल्या अनेक भागात जोरदार पावसाचं आगमन झालं. मात्र अजूनतरी या पावसाचा कोणताच परीणाम दिसून आलेला नाही. लोकल रेल्वे वेळेवर सुरू आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत 9 जूनला जोरदार पावसाची शक्यता आहे.मुंबईत सोमवारी 3 जून रोजी पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या. पावसाच्या पहिल्याच सरीत मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जून दरम्यान पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्याने तो याआधीच्या पावसाचं विक्रम मोडणार, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

त्यामुळे नागरिकांनी समुद्राच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि गरज पडल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं होतं. यंदा 2005 प्रमाणे पूरस्थिती उद्भवणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.हेही वाचा

मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईड


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा