शनिवार-रविवारच्या पावसाची विक्रमी नोंद, दशकातील दुसरा सर्वाधिक पाऊस

शनिवारी, ऑक्टोबर रोजी शहरातील काही भागात संध्याकाळी काही तास मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. पावसासोबतच गडगडाट आणि वादळी पावसाचा अनुभव देखील मुंबईकरांना आला. त्यानंतर रविवारी सकाळी देखील  पावसानं जोरदार बॅटिंग केली.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच शनिवार आणि रविवारी कोसळलेल्या पावसानं पुन्हा एक रेकॉर्ड बनवला आहे. ऑक्टोबर महिन्यातील चोवीस तासात झालेला दुसरा सर्वाधिक पाऊस म्हणून याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ८.३० पर्यंत सांताक्रूझ हवामान खात्यानं २४ तासांत ५५. ८ मिमी पावसाची नोंद केली. तर कुलाबा हवामान वेधशाळेत १५ मिमी पावसाची नोंद केली.

रविवारी भारतीय हवामान विभाग (IMD)चे पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसलीकर म्हणाले की, “मुंबईत दोन वेगवेगळ् वेळेत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. एक शनिवारी संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पाऊस कोसळला. तर दुसरा रविवारी सकाळी ३.३० ते सकाळी ५ या वेळेत पाऊस पडला.”

मुंबईत ४ ऑक्टोबर १९९८ साली आजपर्यंतचा सर्वाधिक पाऊस म्हणजेच १४०.८ मिमी इतका झाला आहे. तर या दशकांचा विक्रम १३ ऑक्टोबर २०११ रोजी झाला होता, तेव्हा जास्तीत जास्त शहरात ७१ मिमी पाऊस पडला होता.

शनिवारी सायंकाळी आणि रविवारी पहाटे, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमधील अनेक भागात ७० मिमी आणि १०० मिमी दरम्यान पाऊस झाला. तथापि, त्यानंतर रविवारी सकाळी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या दरम्यान पावसाची नोंद झाली नाही.

तर सोमवारीही हलका पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता IMD नं वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात हंगामी पाऊस सामान्य झाला आहे. महाराष्ट्रात यंदा १८ टक्क्यांनी जास्त पाऊस झाला असून मराठवाड्यात संपूर्ण हंगामात अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. जरी दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १९ टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस सामान्य मानला जात असला, तरी मराठवाड्यात ८६६.१ मिमी पावसाच्या हंगामी सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पाऊस झाला आहे. तथापि, विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये अमरावती (-२०), अकोला (-२७) आणि यवतमाळ (-२४) इतकी पावसाची नोंद झाली.


हेही वाचा

विक्रोळीत १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवड

चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या