Ganpati festival 2020 'लालबागचा राजा'नंतर शिवाजी पार्कचा गणेशोत्सव रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाचा फटका मुंबईच्या गणेशोत्सवावर बसला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साडेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, तर 'नवसाला पावणारा' राजा अशी ख्याती असलेल्या 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं ही यंदा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णर घेतला. त्यानंतर आता 'शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'नेही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव रद्द केला आहे.

बहुतांशी मंडळे मूर्ती, देखावे यात बदल करून उत्सवाचे रूप शक्य तितके साधे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु उत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी आरोग्य, रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत.

त्यानंतर आता शिवाजी पार्क येथील केळुस्कर मार्गावरील ‘शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने’ही सामाजिक जबाबदारीचे भान राखत यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील ४८ वर्षांपासून हे मंडळ कार्यरत आहे. मंडळाचे वैशिष्ट्य असलेला देखावा व रोषणाई पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. यंदा गणेश भक्तांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा -

गुड न्यूज! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात, डाॅक्टरांनी पोलिसांना दिली ‘ही’ माहिती


पुढील बातमी
इतर बातम्या