Advertisement

Ganeshotsav 2020: यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाच सावट


Ganeshotsav 2020: यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाच सावट
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं सर्वच सोयी-सुविधांवर कोरोनाचं संकट आहे. अशातच, मुंबईत गणेशोत्सवर ही यंदा कोरोनाचं संकट ओढावलं आहे. यंदा महापालिकेसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलं आहे. त्यानुसार, नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, यंदाचा गणेशोत्सव ‘एक प्रभाग, एक सार्वजनिक गणपती’ संकल्पनेवर साजरा करावा, अशी साद मुंबईतील अंधेरी येथील ‘के ’ पश्चिम पालिका विभाग कार्यालयाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घातली आहे.

एका नगरसेवकाच्या प्रभागातील मंडळांनी एकत्र येऊन एका गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साजरा करीत एकोप्याचे दर्शन घडवावं, असे आवाहन यानिमित्तानं करण्यात आलं आहे. मुंबईमधील कोरोनास्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही. झोपडपट्ट्यांमधील रुग्णसंख्येवर नियंत्रण येत असतानाच उच्चभ्रू वस्त्या आणि इमारतींमध्ये नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळं महापालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी, आरोग्य शिबिरांचा सपाटा लावला आहे.

अंधेरी पश्चिम भागात १५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असून १३ नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन एकच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ‘के-पश्चिम’ विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केले आहे. मात्र, या संकल्पनेला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिन्वय समितीने विरोध केला आहे. मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी करावी, असे समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.

यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी नाही. विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात येणार असून तेथेच गणेश विसर्जन करावे. तलावांवर गर्दी होऊ नये या उद्देशाने सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावरच घरगुती गणेशमूर्ती स्वीकारून तिचे कृत्रिम तलावांमध्ये पालिकेतर्फे विसर्जन करण्याचा मानस आहे.



हेही वाचा -

महापालिकेच्या संलग्न रुग्णालयांत अन्य रुग्णांवरच उपचार

Coronavirus Pandemic : राज्यात ९५१८ नवे रुग्ण, २५८ जणांचा दिवसभरात मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा