यंदाच्या दिवाळीत गिफ्टचं नो टेन्शन! हे वाचा...

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

सध्या लोकांची सेलिब्रेशनची व्याख्याच बदलत आहे. हल्ली नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे मोकळा वेळ मिळतच नाही. त्यामुळे निमित्त सेलिब्रेशनचं म्हणून एकमेकांच्या भेटीगाठी होतात. या भेटीगाठीत भेटवस्तूंना देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने नातेवाईक आणि व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू महत्त्वाच्या मानल्या जातात. या भेटवस्तूंचे स्थान लक्षात घेता, ही खरेदी अत्यंत लक्षपूर्वक केली जाते, हे वेगळे सांगायलाच नको.

हल्ली भेटवस्तू द्यायचे झाल्यास वेगळे बजेट ठेवले जाते. मग घाऊक बाजारपेठेच्या वाऱ्या केल्या जातात. या सर्व गुंत्यातून बाहेर पडून उत्तम पर्याय निवडायचा असेल, तर भेटवस्तू म्हणून चॉकलेट देणे हा सर्वोत्तम आणि लोकप्रिय प्रकार आहे.

यंदाच्या दिवाळीत काय गिफ्ट द्याल?

कॉर्पोरेटच्या युगात गिफ्ट पर्याय म्हणून चॉकलेट निवडले जाते. यामध्ये होममेड चॉकलेट बॅग, चॉकलेट बुके, चॉकलेट परडी याची अधिक चलती आहे. चॉकलेटमध्ये विविध फ्लेवर असल्यामुळे निवडीत वैविध्य पहायला मिळत आहे. नातेवाईक मित्र-मैत्रिणींपासून इतर कुणालाही देण्यात येणारे हार्ट फ्लॉवर असे वेगवेगळ्या तुमच्या आवडीप्रमाणे विविध आकारात आणि डार्क, मिल्क, व्हाईट, कॅरेमल अशा विविध फ्लेवरमध्ये हे चॉकलेट उपलब्ध आहेत.

चॉकलेट घरच्या घरी कसे बनवाल?

यू ट्युबवर व्हीडिओ बघून हे चॉकलेट घरच्या घरी देखील बनवता येऊ शकतात. चॉकलेटला लहान मुलांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या साच्यांचा वापर करून वेगवेगळा आकार देता येऊ शकतो. लहान मोठ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारे पॅकिंग करूनही चॉकलेट गिफ्ट देताना त्यात कलात्मकरित्या वेगळेपण आणणे सहज शक्य आहे. चॉकलेट गिफ्ट हे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना अत्यंत लोकप्रिय वाटणारे गिफ्ट असल्यामुळे सध्या मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे.

दहा-बारा वर्षांपूर्वी काजू कतली आणि खव्यापासून बनवलेल्या मिठाईला विशेष महत्त्व होते. पण कालांतराने मिठाईच्या जोडीला सुकामेवा आणि खव्यापासून बनवलेली मिठाई फ्रीज बाहेर राहिली, तर अल्प काळात खराब होत असल्यामुळे सुक्यामेव्याच्या जोडीला विविध फ्लेवरमधले चॉकलेट दिले जाऊ लागले. त्यात देशी-विदेशी कंपन्या चॉकलेट गिफ्ट घरी पोहचवण्याची देखील बऱ्याच सुविधा देत असल्यामुळे चॉकलेट सध्या ट्रेंडिंगला असल्याचे पहायला मिळत आहे. चॉकलेट गिफ्ट देताना त्याचे पॅकिंग आकर्षक असेल तर ते पहाताच समोरच्या व्यक्तीला आकर्षित करते. त्यामुळे फ्लेवरप्रमाणेच पॅकिंगलाही तितकेच महत्त्व आहे.

या ठिकाणी स्वस्तात विकत घ्या चॉकलेट गिफ्ट!

मुंबई शहरात दादर, मस्जिद बंदर, कुर्ला या बाजारपेठांमध्ये हे चॉकलेट गिफ्ट उपलब्ध आहेत. अगदी 35 रुपयांपासून वेगवेगळ्या किंमतींमध्ये हे चॉकलेट उपलब्ध आहेत. ज्यांना हे चॉकलेट गिफ्ट परवडत नाहीत, त्यांच्यासाठी सिंगल चॉकलेट घेऊन आकर्षक पॅकिंग करता येऊ शकतात. मार्केटमध्ये विविध आकारातील परड्या, बॅग, बॉक्स पॅकिंगसाठी उपलब्ध आहेत. तसेच, विविध आकारात घरी चॉकलेट तयार करण्यासाठी साचे देखील उपलब्ध आहेत.


हेही वाचा - 

दिवाळीची शॉपिंग करताय? मग दादरमध्ये या!

दिवाळी अंकांवर कुठे मिळेल भरघोस सूट? वाचा...

पुढील बातमी
इतर बातम्या