Advertisement

गिफ्ट, सुक्या मेव्याकडे ग्राहकांनी फिरवली पाठ


गिफ्ट, सुक्या मेव्याकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
SHARES

दिवाळी म्हटले की एक आनंदाचा उत्सव..दिवाळीमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा ही जुनी आहे. गेल्या काही वर्षांपासून भेटवस्तूंसोबतच मिठाई व्यतिरिक्त सुका मेवा देण्याची प्रथा आहे. मात्र यंदा गिफ्ट आणि सुक्यामेव्यावर संक्रात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा जर तुम्ही गिफ्ट किंवा सुका मेवा मिळण्याच्या आशेषवर असाल तर तुमची निराशा होण्याची शक्यता आहे.


जीएसटीचा फटका सुका मेवा आणि गिफ्टला

नुकताच संपूर्ण देशासह राज्यात जीएसटी कर लागू झाला. त्यामुळे काजू, बदाम, खारीक, अक्रोड, यांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा सुक्यामेव्यावर देखील संक्रात आल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी दिवाळीच्या हंगामात वाशी आणि मस्जिद बंदर येथील सुक्या मेव्याच्या घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांसह गर्दी उसळते. मात्र यंदा ही गर्दी कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.



क्रॉफर्डमध्येही ग्राहकांची पाठ

दरवर्षी दिवाळीच्या आधी क्रॉफर्ड मार्केटकमध्ये ग्राहकांची गर्दी उसळलेली पहायला मिळते. मात्र यंदा ही गर्दी कमी झाली आहे. त्यातच गिफ्टसाठी दिलेल्या मोठमोठ्या ऑर्डर्स देखील कमी झाल्याची माहिती इथल्या विक्रेत्यांनी दिली. सुका मेवा पॅक करण्यासाठी लागण्याऱ्या बॉक्स आणि विविध रंगी टोकरीची मागणी देखील घटल्याचे पहायला मिळते. विशेष म्हणजे बदामावर 12 टक्के, काजूवर 5 टक्के आणि इतर वस्तूंवर जीएसटी लागल्यामुळे हे सगळे भाव वाढलेत.


असे आहेत दर -

  • बदाम - 1200 ते 3200
  • काजू - 700 ते 1000
  • चारोळी - 1000 ते 1200
  • पिस्ता - 1500 ते 1700
  • अक्रोड - 1200 ते 1600
  • खारीक - 180 ते 280

हे असे चित्र पहिल्यांदा पहायला मिळत आहे. दरवर्षी आम्हाला या दिवसात कुणासोबत बोलायलाही वेळ मिळत नसे. मात्र यंदा ग्राहकच येत नसल्याने आणि मोठ्या ऑर्डर नसल्याने बाजार सुनासुना आहे.
- मनीष कदम, विक्रेते


हेही वाचा - 

घरगुती तयार फराळ हवाय? मग दादरला या..!

किराणा महागला! सांगा दिवाळी साजरी कशी करायची?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा