Advertisement

किराणा महागला! सांगा दिवाळी साजरी कशी करायची?


किराणा महागला! सांगा दिवाळी साजरी कशी करायची?
SHARES

गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय,

महागाईने पिचलेल्याला होळी काय, दिवाळी काय...

यंदाच्या दिवाळीत महागाईनं पिचलेल्या सर्वसामान्यांच्या मनात हाच प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. त्यामुळे फराळ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांची लगबगही सुरू झाली आहे. दिवाळी असूनही व्यापारी धान्य आणि डाळींची खरेदी करत नसल्यानं सध्या घाऊक बाजारात या वाण सामानांचे दर वाढल्याचं दिसत आहे. परिणामी ग्राहकांना महाग दराने या वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत.

सध्या घाऊक बाजारात उत्तम तूर डाळ ६५ ते ७० रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध आहे. तीच तूर डाळ किराणा दुकानात मात्र प्रति किला १००-१२० रुपये किलोने सर्वसामान्यांना खरेदी करावी लागत आहे. दिवाळीत लागणाऱ्या इतर वाणसामानाचे दर देखील २०-२५ रुपयांनी महागल्याचं दिसून येत आहे.


जीएसटीमुळे सर्वसामान्य त्रस्त

गेल्यावर्षी डाळीचे उत्पन्न कमी असल्याने डाळींच्या किंमती वाढल्या होत्या. परंतु, यंदा डाळीचे उत्पन्न अधिक झाल्याने या डाळी घाऊक बाजारात ६०-६५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. असे असले, तरी किरकोळ किराणा स्टोअर्समध्ये या डाळींचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याचं दिसून येत आहे. किराणा व्यापारी वस्तूंच्या किमतीत जीएसटीचा दर जोडत असल्याने या वस्तू महागल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांत आवक कमी झाल्याने उडीद डाळ पुन्हा एकदा ९० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर खोबऱ्याचे दर २०० ते २२० रुपये किलोवर गेले आहेत.


'व्हॅट'च्या जागी आता 'जीएसटी' आला आहे. तरीही दरांत विशेष फरक पडलेला नाही. धान्यांचे दर कमी झाल्याने रविवारपासून आम्ही डाळींचे दर कमी करणार आहोत. ग्राहकांची आम्ही फसवणूक करत नाही. जे बाजारात दर आहेत, त्यानुसारच आम्ही वस्तू विकतो. शुक्रवारी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे रोजच्या वापरातील काही वस्तूंचे दर कमी झाले आहेत. जीएसटीमुळे पक्के बिल बनवावे लागत आहे, ही कल्पना उत्तम आहे. त्यामुळे आमचे काम देखील सोपे झाले आहे.

- मालक, शाह जाधवजी नर्सी कंपनी, दादर


दरवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी निमित्त कोणत्याही पदार्थाचे दर वाढलेले नाहीत. रव्याचे दर ३६ रुपयांवरून ३४ रुपयांवर आले आहेत. 'जीएसटी'मुळे कोणत्याही वस्तूचे दर कमी किंवा जास्त झालेले नाहीत. तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहक कमी आहेत.  

- मालक - पटेल स्टोअर्स, दादर


किराणा दुकानातील वस्तूंचे दर : 

वस्तूकिंमत (प्रति किलो, रु. )
चना डाळ
८८.८८

रवा
३४.३२

मैदा
३४.३६

साखर
४०-४४
पिठी साखर
५२.६०

उडीद डाळ
९०-१२०

मूग डाळ
६८-८०

गूळ
६०.६०

शेंगदाणे
१००-१२०

खोबरे
२००-२२०

तूर डाळ
१००-१२०

तेल
८०-१००

बदाम
१०००-१२००

काजू
८००



हेही वाचा -

रेपो रेट ६ टक्क्यांवर स्थिर, महागाई वाढण्याचे संकेत

एसटी बसस्थानकावर आता दिवाळीच्या फराळाचा 'स्टँड'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा