दिवाळी स्पेशल करायचीये? मग लोकरीचे कंदील लावा!


SHARE

कोणताही सण आला तरी मुंबईकरांची पाऊले वळतात ती दादर मार्केटच्या दिशेने. आता दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो आकाश कंदील. सध्या या आकाश कंदिलांच्या विक्रीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.

दादरच्या बाजारपेठेत दरवर्षी पारंपारिक पतंग, कागदाचे कंदील विक्रीसाठी ठेवण्यात येतात. त्याचबरोबर चायना कंदीलही ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. परंतु, गेल्या 7 वर्षांपासून मुलुंडमधील प्रसिद्ध असलेले वक्रतुंड आर्टस लोकरीच्या कपडापासून तयार केलेले कंदील विक्रीसाठी ठेवतात. गेल्या 3 वर्षांपासून हे कंदील दादरमध्ये देखील विक्रीसाठी ठेवले जातात.यंदा वक्रतुंड आर्टस् कडून 6 हजारहूून अधिक वेगवेगळ्या रंगसंगतीचे कंदिल बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या कंदीलांच्या किंमती 100 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत आहेत. हे कंदील बनवणारा कलाकार विघ्नेश जांगळी हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. विघ्नेश कॉलेजमध्ये शिकता शिकता कंदील बनवतो. दरवर्षीप्रमाणे विघ्नेश वेगवेगळ्या 12-13 डिझाईन बाजारात आणण्याचा प्रयत्न करतो. हे कंदील कपडापासून तयार केल्यामुळे टिकाऊ असतात. वापरून झाल्यानंतर ते व्यवस्थित ठेवले, तर पुन्हा वापरता येऊ शकतात.


परदेशातही पाठवले जातात कंदील

वक्रतुंड आर्टकडून कंदील खरेदी करून मलेशिया, युके, दुबईतील नातेवाईकांना पाठवणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी नाही. दरवर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीसुद्ध हेच कंदील लावण्यात येतात. मराठी सिने सृष्टीतील अनेक कलाकार या ठिकाणाहून कंदिलांची खरेदी करतात. दादरच्या स्वामी समर्थ यांच्या मठात, तसेच प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात विघ्नेश यांचे कंदील लावले जातात. वर्षभर सजावटीसाठीदेखील अनेक हॉटेलमध्ये हे कंदील लावले जातात. एका ग्राहकाने तर वर्कतुंड आर्टस् मधील कंदील बनवणाऱ्या व्यक्तीला दिल्लीला विमनाने घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे!आकाशकंदीलाच्या विक्रीसाठी माहीमच्या कंदील गल्लीचे अनेक वर्षांपासून वर्चस्व होते. परंतु, गेल्या 3 वर्षांत मात्र वर्कतुंड आर्ट्सने सादर केलेला नवा ट्रेंड ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. या कंदिलांना बाहेरगावी पाठवण्यासाठी छान पॅक करून देण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे. तरुण व्यावसायिक म्हणून विघ्नेश हा मराठी तरुणांसाठी एक आदर्श आहे.


बचत गटातील महिलांसाठी रोजगार निर्मिती

यंदा वर्कतुंड आर्ट्सचे काही कंदील बनवण्याची संधी मुंबई शहरातील महिला बचत गटांना देण्यात आली होती. त्याअंतर्गत मुंबईमधील महिला बचत गटांनी यंदा वर्कतुंड आर्ट्सचे काही कंदील तयार केले आहेत.


स्पेशल विद्यार्थ्यांनी देखील बनवले कंदील

या दिवाळीसाठी कंदील बनवण्याचे काम गेले 7 महिने सुरू आहे. त्यामुळे कार्यशाळेच्या माध्यमातून ठाण्यातील 'जागृती पालक संस्था' येथे विघ्नेश यांनी 100 कंदील घडवण्याची संधी या विशेष मुलांना दिली होती. आपल्याकडे 50 हून अधिक कामगार असताना देखील या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी हा प्रयत्न यंदा विघ्नेश यांनी केला आहे.


स्वदेशीचा स्वीकार, चीनी वस्तूंचा बहिष्कार

'स्वदेशीचा स्वीकार - चीनी वस्तूंचा बहिष्कार, समृद्ध होईल देश - वाढेल रोजगार' या वाक्याला अनुसरून विघ्नेश यांनी भारतीय बनावटीचे इको फ्रेंडली कंदील बनवले आहेत.

'से नो टू चायना' असे म्हणत यंदा ही संकल्पना घेऊन कंदिलांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. कला सार्थकी लागल्यासारखे वाटत आहे. चायना कंदिलाच्या तोडीस तोड असणारे पारंपारिक कंदील बनवण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

विघ्नेश जांगळी, कंदील विक्रेताहेही वाचा - 

वुलन कपड्यांचे कंदील

कागदी पुठ्ठ्यांचे इकोफ्रेंडली कंदील


संबंधित विषय