वुलन कपड्यांचे कंदिल


  • वुलन कपड्यांचे कंदिल
SHARE

दादर- वक्रतुंड आर्ट यांनी यंदा 5 हजार आकाश कंदिल विक्रीसाठी ठेवले आहेत. या कंदिलांच्या किंमती 100-800 रुपयांपर्यंत आहेत. या कंदिलांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे उलन कपड्यापासून बनवण्यात आले आहेत. उलन कपड्यापासून साधारण इको फ्रेंडली कपड्याच्या पिशव्या बनवल्या जातात, पण उलन कपड्यांपासून कंदिल बनवण्याचा हा मुंबई शहरातला पहिलाच प्रयोग आहे. कंदिल बनवणारा विघ्नेश जांगळी हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. यामधले अनेक कंदिल मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही पाठवण्यात आलेत. जानेवारीपासूनच कंदिल बनवण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. मुंबईमध्ये वक्रतुंड आर्टच्या चार शाखा आहेत. कमी वेळात एका मराठी तरुणाचा व्यवसाय वेगात चालावा आणि मुंबईत त्याच्या चार शाखा असाव्यात ही कौतुकास्पद बाब आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या