Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीत बोनस नाही?


बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीत बोनस नाही?
SHARES

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीत बोनस मिळणे कठीण असल्याची शक्यता बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी वर्तवली आहे.

बेस्ट समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विषय मांडण्यात आला. त्यासंबंधातील चर्चेत एकाबाजूला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार देणे बेस्टला अवघड झालेले असताना कर्मचाऱ्यांना बोनस कसा द्यायचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात बेस्टने प्रवाशांना उत्कृष्ट सेवा पुरवली. त्याचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. पण दुसऱ्याच बाजूला बेस्टला प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेमके करायचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला.

पण यावेळी बेस्ट सद्यस्यांनी बक्षीस स्वरूपात बोनस द्यावा, अशी मागणी केली. तर सुहास सामंत यांनी सांगितले की महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका प्रशासनाने बेस्टच्या विलानीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी मागणी केली. तर शिवसेनेच्या माध्यमातून बोनस मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, असे बेस्ट समिती अध्यक्ष यांनी सांगितले.

वेतनासाठी संप केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असला, तरी १० तारखेच्या आत पगार देणे बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत सामावून घेणे इ मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. त्यातच बोनस न मिळाल्यास बेस्ट कर्मचारी पुन्हा संपावर जाणार का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.



हेही वाचा -

बेस्ट आर्थिक तोट्यातून बाहेर येणार कधी?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा