Advertisement

बेस्ट कामगारांना वेळेत पगार ‘इस्क्रो’ खात्यातील बदलामुळेच!


बेस्ट कामगारांना वेळेत पगार ‘इस्क्रो’ खात्यातील बदलामुळेच!
SHARES

बेस्ट कामगारांना महिन्याच्या दहा तारखेला पगार देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर या महिन्याचा पगारही दहा तारखेला झाला. बेस्ट उपक्रम तोट्यात असताना ही किमया कशी साधली गेली? असा प्रश्न सर्वांनाच पडला असून यासाठी आयसीआयसीआय बँकेतील इस्क्रो खात्याच्या कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा करून ही रक्कम देण्यात येत आहे.


४०.५८ कोटी रुपये महिन्याचा हप्ता

मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला १६०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली आहे. या रकमेच्या अनुषंगाने बेस्ट उपक्रम आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारातील अटींप्रमाणे मुद्दल व व्याजाची नियमित परतफेड होण्यासाठी आयसीआयसीआय बँकेत इस्क्रो खाते उघडून त्यात बेस्ट उपक्रमाला मिळणारी सर्व मिळकत जमा करण्यात येते. तिथून मग स्टेट बँक ऑफ इंडियामधील महापालिकेच्या सर्वसाधारण निधी खात्यात बेस्ट खात्याच्या निर्देशानुसार मुद्दल व व्याजाचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात येतो. बेस्ट उपक्रमाकडून प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला महापालिकेला देण्यात येणारी मुद्दल व व्याज मिळून हप्त्यापोटी एकूण ४०.५८ कोटी इतकी रक्कम जमा केली जाते.


सामंजस्य करारातील अटी-शर्तीत बदल

४०.५८ कोटी रुपयांची रक्कम महिन्याच्या सुरुवातीला ३ ते ४ दिवसांतच जमा होते व इस्क्रो खात्याच्या कार्यपद्धतीमुळे आयसीआयसीआय बँक पुढील २६ ते २७ दिवस महापालिकेला द्यावयाची रक्कम १ तारखेपर्यंत स्वत: वापरुन नंतर १ तारखेला महापालिकेला अदा करते. त्यामुळे यामध्ये बदल करून महिन्याच्या १ तारखेपासून ही रक्कम जमा करण्याऐवजी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील २३ तारखेपासून जमा होणाऱ्या महसुलातून महापालिकेला देण्यात येणारी मुद्दल व व्याजाच्या रकमेचा हप्ता पूर्वीप्रमाणे १ तारखेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला बेस्टला हे पैसे जमा करून पगारासाठी वापरता येईल व महापालिकेलाही ही रक्क्कम देता येईल, अशाप्रकारे बँक कारभाराच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.



हेही वाचा

असा जमा झाला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा