कागदी पुठ्ठ्यांचे इकोफ्रेंडली कंदिल

 BMC office building
कागदी पुठ्ठ्यांचे इकोफ्रेंडली कंदिल

परळ - फोल्डिंगच्या इको फ्रेंडली मखरांसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्सवी या संस्थेनं यंदा दिवाळीच्या निमित्तानं पुठ्ठ्यापासून इको फ्रेंडली कंदील तयार केले आहेत. कंदीलविक्रीचं संस्थेचं हे पहिलंच वर्ष असून 5 हजार कंदिल विक्रीसाठी ठेवलेले आहेत. या संस्थेनं तयार केलेले मखर आणि गणेशमूर्ती परदेशी पाठवल्या जातात. त्याचप्रमाणे यंदा अनेकांनी कंदीलही आपल्या नातेवाईकांना परदेशी पाठवले आहेत. वर्षाचे 12 महिने संस्थेत कलाकार काम करत असतात. यंदा 750 रुपयांचा कंदील फक्त 490 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. 'ग्राहकांचा प्रतिसाद असाच राहिला, तर पुढील वर्षी हे कंदिल ना नफा ना तोटा तत्वावर सर्वसामान्यांना परवडतील अशा किंमतीत विक्रीसाठी ठेवण्यात येतील,' असं उत्सवी संस्थेचे मालक नानासाहेब शेंडकर यांनी सांगितलं.

Loading Comments