Advertisement

रेपो रेट ६ टक्क्यांवर स्थिर, महागाई वाढण्याचे संकेत


रेपो रेट ६ टक्क्यांवर स्थिर, महागाई वाढण्याचे संकेत
SHARES

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॅ. उर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील ६ सदस्यीय चलनविषयक आढावा समिती (मॅनिटरी पॅलिसी कमिटी)ने पतधोरण जाहीर करताना बुधवारी रेपो रेट ६ टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत. महागाई आणि आंतरराष्ट्रीय कल पाहून समितीने हा निर्णय घेतला आहे. 

ईएमआय कमी होण्याची अपेक्षा असलेल्या कर्जदारांची या निर्णयामुळे कदाचित निराशा होण्याची शक्यता आहे. याचसोबत रिझर्व्ह बँकेने ग्रोथचा अंदाज घटवून ७.३ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर आणला आहे.

या समितीने सीआरआरमध्येही कुठलेच बदल केलेले नाही. त्यामुळे ‘सीआरआर’ देखील ४ टक्क्यांवर कायम आहे. मात्र समितीने ‘एसएलआर’ ५० बेसिस पाँईंटने कमी करून १९.५ टक्क्यांवर आणला आहे. 

बँकांना एक निश्चित फंड आरबीआयकडे जमा करावा लागतो, त्याला ‘स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो’ (एसएलआर) असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे की बँकांना आता आरबीआयकडे कमी रक्कम जमा करावी लागेल. याचाच दुसरा अर्थ म्हणजे बँकांच्या हाती कर्ज देण्यासाठी जास्त फंड असेल. 


महागाई वाढणार

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रात महागाई वाढण्याचे संकेत दिले आहेत. पतधोरण आढाव्यात नमूद केल्यानुसार महागाई दर ४.२ टक्के ते ४.६ टक्क्यांदरम्यान असेल. आरबीआयने मार्च २०१८ पर्यंत महागाई दर ४ टक्क्यांपर्यंत आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

डाॅ. पटेल यांनी या आढाव्यात मॅन्युफॅक्चरींग सेक्टरविषयी चिंता व्यक्त केली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सत्रात मॅन्युफॅक्चरींग पूर्णपणे मंदावल्याने त्याचा परिणाम रोजगारावरही झाल्याचे म्हटले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा