Advertisement

दिवाळी अंकांवर कुठे मिळेल भरघोस सूट? वाचा...


दिवाळी अंकांवर कुठे मिळेल भरघोस सूट? वाचा...
SHARES

दिवाळी म्हटल्यावर घराची सजावट, खरेदी, फराळ या गोष्टी तर साहजिकच आल्या. पण याचसोबत दरवर्षी दिवाळी अंक हा वाचकांच्या आवडीचा विषय असतो.

खवय्यांना ज्या प्रकारे वेगवेगळे पदार्थ खाण्याचे वेध लागतात, त्याचप्रमाणे वाचकांना वेगवेगळे दिवाळी अंक वाचण्याची आतुरता असते. दिवाळीनिमित्त अनेक वेगवेगळ्या वस्तूंवर भरघोस सूट देऊन दुकानदार ग्राहकांना आकर्षित करतात. या दिवाळीच्या सणाला ग्रंथ संपदेवर देखील विविध प्रकारची सूट देऊन दरवर्षी मॅजिस्टिक ग्रंथालीसारखी प्रकाशने वाचकांना खास साहित्य फराळ भेट देत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत रुचकर फराळाबरोबरच बौद्धिक फराळाची अर्थात दिवाळी अंकांची मेजवानी पहायला मिळत आहे. ही मेजवानी सर्वांच्या पसंतीस उतरण्याच्या दृष्टीने यंदा ग्रंथाली, शब्द आणि मॅजिस्टिकसारख्या प्रकाशन संस्थांनी दिवाळी अंकाच्या योजना जाहीर केल्या आहेत.



यंदा वाचकांसाठी काय?

ग्रंथाली प्रकाशनाच्या योजनेत अरुण शेवते यांचा ऋतुरंग, झी मराठी आणि ग्रंथालीचा नक्षत्रांचे देणे आणि रुची या दिवाळी अंकांचा समावेश आहे. ऋतुरंगमध्ये गुलझार, लता मंगेशकर, सौमित्र पर्यंतच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. झी मराठी आणि ग्रंथाली यांनी एकत्रितरित्या 'नक्षत्रांचे देणे'ची निर्मिती केली आहे. यंदाच्या या दिवाळी अंकात 'झी'चा विविध अंगांनी मागोवा घेण्यात आला आहे. 'शब्दरूची दिवाळी अंका'त वसंत आबाजी डहाके ते प्रवीण बांदेकर यांनी लेखन केले आहे. या अंकांसोबत अरुण शेवते यांचा पुस्तक संच देण्यात येणार आहे. 1200 रुपयांची ही ग्रंथ संपदा 800 रुपयांत वाचकांसाठी उपलब्ध आहे.

'शब्द'ने जाहीर केलेल्या योजनेत 'मौज साप्ताहिक' सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, मुक्त शब्द, अक्षर, कालनिर्णय सांस्कृतिक, ऋतुरंग या अंकांचा तसेच 'विवादे विशादे प्रमादे प्रवासे' हा प्रशांत बागड यांचा कथासंग्रह, परीकथा आणि वास्तव या विश्राम गुप्ते यांच्या ललित संग्रहाचा समावेश आहे.



दिवाळी अंकांवर भरघोस सूट

सालाबादप्रमाणे यंदा मॅजिस्टिक प्रकाशनने देखील दिवाळी अंकांवर भरघोस सूट देत पुन्हा एकदा वाचकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. 1,225 रुपयांचा मॅजिस्टिकचा दर्जेदार संच दिवाळी निमित्त 950 रुपयांत वाचकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये दीपावली, कालनिर्णय, अक्षर, महाराष्ट्र टाईम्स, मौज, अनुभव या दर्जेदार दिवाळी अंकांसोबत सतीश जोशी यांचे 'सहावे महाभूत आणि मी', डॉ. बाळ फोंडके यांचं तीन पायांची शर्यत, विजय तांबे यांचं तथाकथित, द्वारकानाथ संझगिरी यांचं भटकेगिरी या चार पैकी एक पुस्तक या संचासोबत मिळणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मॅजिस्टिक कालनियोजक डायरी भेट म्हणून सोबत मिळणार आहे.


आयडियल बुक डेपोमध्ये वाचकांसाठी भव्य प्रदर्शन

दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या आयडियल बुक डेपोमध्ये वाचकांसाठी भव्य प्रदर्शन आणि विक्रीसाठी दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत. 1 ते 4 अंकांच्या खरेदीवर 10 टक्के सूट, 5 ते 19 अंकांच्या खरेदीवर 15 टक्के सूट, 20 आणि त्याहून अधिक खरेदीवर 20 टक्के सूट देण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. सकाळी 9.30 ते रात्री 8.30 दरम्यान हे प्रदर्शन खुले रहाणार आहे.



हेही वाचा - 

कसा आहे झी मराठीच्या ‘उत्सव नात्यांचा’ विशेष दिवाळी अंक?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा