Advertisement

कसा आहे झी मराठीच्या ‘उत्सव नात्यांचा’ विशेष दिवाळी अंक?


कसा आहे झी मराठीच्या ‘उत्सव नात्यांचा’ विशेष दिवाळी अंक?
SHARES

दिवाळी सण आला की नवीन कपडे, फराळ, रोषणाई हे आलंच. पण या सगळ्यांबरोबर अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे 'दिवाळी अंक'. वर्षातून एकदा येणारा सर्वांचाच आवडता दिवाळी सण आणि या सणाच्या निमित्ताने वाचायला मिळणारे विविध दिवाळी अंक. या वर्षी प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका दाखवणाऱ्या 'झी वाहिनीने' पहिल्यांदाच दिवाळी अंक ‘उत्सव नात्यांचा’ प्रसिद्ध केला आहे. झी मराठी वाहिनीने नुकतीच अठरा वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने झी मराठीने दिवाळी अंक बाजारात आणला आहे.



या अंकाला प्रेक्षकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. या अंकाची पहिली आवृत्ती अवघ्या तीन दिवसांत संपली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीने या अंकाची दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत हा अंक बाजारात उपलब्ध होणार आहे.



झी मराठीचा हा पहिलाच दिवाळी अंक असल्याने या अंकात नक्की काय वाचायला मिळणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. या अंकामध्ये अनेक मातब्बर मंडळींच्या लेखांचा समावेश आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय असलेले अनुभवी कलाकार सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर, रवी जाधव, संजय मोने, संजय जाधव, सुकन्या मोने, हृषिकेश जोशी यांनी आपले या क्षेत्रातील अनुभव, त्यांची जडण घडण, त्यांचा संघर्ष, झी सोबत असलेलं नातं याबद्दलच्या अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. याशिवाय भारतकुमार राऊत, नितीन वैद्य, माधवी मुटाटकर ज्यांनी झी मराठीचा पाया रचला, अशा मंडळींनीही झी मराठीचे सुरुवातीचे दिवस कसे होते, याबद्दल सविस्तर लेख लिहिले आहेत. याशिवाय सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, प्रिया बापट, उमेश कामत, डॉ. निलेश साबळे या आजच्या पिढीच्या कलाकारांचेही अनेक रंजक अनुभव यातून वाचायला मिळणार आहेत. याशिवाय हास्य धमाल, झी मराठीची शीर्षकगीतं, बदलतं मनोरंजन क्षेत्र यांसारख्या विविध विषयांवरील लेखांचा यात समावेश आहे.



हेही वाचा

'तुम्हारी सुलु'चा ट्रेलर प्रदर्शित


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा