Advertisement

'तुम्हारी सुलु'चा ट्रेलर प्रदर्शित


'तुम्हारी सुलु'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

'बॉबी जासूस' आणि 'कहानी'सारखे स्त्री केंद्रित चित्रपट केल्यानंतर आता विद्या बालन आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. 'तुम्हारी सुलु' हे चित्रपटाचे नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विद्या बालनचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.



'तुम्हारी सुलु' या चित्रपटात विद्या बालन रेडिओ जॉकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात लेट नाईट रेडिओ जॉकी बनण्याची संधी विद्याला मिळते. 'साडी वाली भाभी लेट नाइट' या शोमध्ये विद्या सेक्सी-सेक्सी गप्पा मारते. त्यामुळे शो कमी वेळात प्रचंड हिट होतो.

चित्रपटात विद्याच्या पतीची भूमिकी मानव कौर करत आहेत. तर सुलुच्या बॉसची भूमिका नेहा धुपिया साकारत आहे. चित्रपटात तुम्हाला मुंबईची राणी मलिष्काची देखील झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी करत आहेत. त्रिवेणी यांनी यापूर्वी अनेक जाहिरातींची निर्मिती केली आहे. 'तुम्हारी सुलु' हा चित्रपट १ डिसेंबर २൦१७ ला प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी देखील विद्या बालननं 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटात रेडिओ जॉकीची भूमिका साकारली होती.



हेही वाचा

...म्हणून ते किशोर कुमार होते!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा