कोरोनामुळे फटाके उत्पादक, विक्रेत्यांचे मोठे नुकसान

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

राज्य सरकारनं यावर्षी फटाके फोडण्यास बंदी घातल्यामुळे २५-३० कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे, असं मुंबईतील फटाके विक्रेते आणि उत्पादक या दोघांनी सांगितलं.

विक्रेत्यांनी सांगितलं की, त्यांच्या वार्षिक विक्रीपैकी ८० टक्के विक्री ही दिवाळी उत्सवावर अवलंबून आहे. एकूण विक्रीपैकी मुंबईचा केवळ २५ टक्के हिस्सा आहे.

सोमवारी, स्थानिक प्रशासनानं लक्ष्मीपूजन म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या दिवशी फटाके फोडण्यास परवानगी दिली. ते म्हणाले की, मुंबईकर 'फुलबाज्या, पाऊस अशांचा वापर करू शकतात. पण केवळ खाजगी परिसरातच फटाके फोडण्यास परवानगी आहे.

दिवाळीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं केली आहे. नागरिकांनी यावर्षी फटाके फोडू नयेत, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. कारण परिणामी प्रदूषणाचा विपरीत परिणाम COVID 19 च्या रुग्णांवर होऊ शकतो. महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात COVID 19 ची परिस्थिती गंभीर आहे.

फटाके फोडण्यामुळे धूर आणि इतर प्रदूषित घटक अधिक प्रमाणात हवेत सोडली जातात. हिवाळ्यात असे घटक वातावरणात जास्त काळ राहू शकतात. प्रदूषणामुळे कोविड रूग्णाच्या फुफ्फुसांवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांमध्ये संक्रमणाचा धोका देखील वाढू शकतो.

कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन अनेक राज्यांनी पश्चिम बंगाल, दिल्ली आणि चंदीगड या फटाक्यांवर बंदी घातली आहे.

सेवरी इथले सुनील स्टोअरमधील कामगारानं असं सांगितलं की, “सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या घोषणेमुळे आमच्या दुकानात फटाके विक्रीत ५० टक्के घट झाली आहे. आम्ही स्टेशनरी स्टोअरमधून आपले पैसे कमवत आहोत. सरकारी प्रोटोकॉल आणि कोरोनाव्हायरस रूग्णांना इजा पोहोचवू नका.”

शीव इथल्या कोळीवाडा कपोले स्टोअरचे मालक जितेंद्र भुता म्हणाले, “आमच्या स्टोअरवर मोजके लोकं आले आहेत. त्यांनी स्पार्कलर्स, चक्र आणि इतरांसारखे ध्वनीविरहित फटाके खरेदी केले आहेत. परंतु इथं कोरोनाव्हायरसमुळे ३० ते ४० टक्के विक्रीत घट झाली आहे. फटाक्यांची विक्री कमी झाल्यामुळे आम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.”

भुता म्हणाले, "दिवाळी व्यतिरिक्त गणपती उत्सव, दसरा, विवाहसोहळा आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये फटाके विकले जातात. निवडणुकांच्या वेळीही आपल्याला एक चांगला व्यवसाय करता येतो. परंतु यावर्षी सर्व काही शांत मार्गानं झाले. आम्ही दिवाळीवर खूप अवलंबून होतो"

मोहम्मद अली रोड इथले फटाके विक्रेता म्हणाले, "आतापर्यंत आम्ही थोडा व्यवसाय करू शकलो. पण आमची विक्री सरासरीपेक्षा कमी होईल. कारण सर्वत्र कोरानामुळे आर्थिक समस्या उद्भवली आहे."

बरेच उत्पादक मुंबईच्या बाहेरील भागात आहेत. मुंबईतील विक्रेते जिल्ह्यातून फटाके खरेदी करतात ज्यासाठी त्यांना भारी लॉजिस्टिकिकल शुल्क देखील द्यावे लागत आहे.


हेही वाचा

दिवाळीत भेटीगाठी टाळण्याचं महापालिकेचं आवाहन

कोरोनामुळं कंदिलाच्या विक्रीत घट

पुढील बातमी
इतर बातम्या