Advertisement

कोरोनामुळं कंदिलाच्या विक्रीत घट

यंदा कोरोनाचं सावट मुंबईसह राज्यावर असल्यानं सर्वच व्यवसायांची गाडी धिम्या मार्गावर धावत आहे.

कोरोनामुळं कंदिलाच्या विक्रीत घट
SHARES

दरवर्षी दिवाळीच्या (diwali) खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कंदिल, पणत्या, फटाक्या घेण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. दिवाळी तोंडावर आली की जिथे व्यावसायिकांना दुपारच्या जेवणाचीही उसंत नसते, अशी खास दिवाळीनिमित्त सर्व बाजारपेठा तोरणांनी सजलेली असते. मात्र, यंदा कोरोनाचं सावट मुंबईसह राज्यावर असल्यानं सर्वच व्यवसायांची गाडी धिम्या मार्गावर धावत आहे. असं असलं तरी दिवाळीनिमित्त ग्राहक खरेदीसाठी बाहेर उतरले आहेत. यंदा माहिमच्या कंदिल गल्लीत (mahim kandil gulli) कागदी, कापडी, लाकडी यांसह अनेक प्रकारचे कंदिल उपलब्ध आहेत. शिवाय,

विजेवर चालणाऱ्या माळा, पणत्या, रांगोळी विक्रीसाठी आल्या असून, ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. मात्र, यंदा कोरोनाचा (coronavirus) फटका या विक्रेत्यांनाही बसला आहे. ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने यंदा दिवाळीसाठीही निम्म्याहून कमी माल मागविण्यात आला आहे.

यंदा आधी माल घेण्याऐवजी ग्राहकांचा प्रतिसाद पाहूनच मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय यंदा नवनवीन प्रकारचे कंदिल बाजारात विक्रीसाठी आले आहेत. भायखळा इथं राहणार लहाने कुटुंब खण कापडाचा वापर करून आकाश कंदिल बनवत आहेत. बाजारात या कंदिलांना मोठी मागणी आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा