नवी मुंबईत कंटेन्मेंट झोनमध्ये विसर्जनासाठी महापालिकेची घरपोच गाडी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. नवी मुंबईत कंटेन्मेंट झोन भागात महापालिकेची एक विशेष गाडी घरोघरी फिरुन गणेश मूर्तीचं संकलन करणार आहे. त्यानंतर गणेश मूर्तींचं महापालिकेच्या स्वयंसेवकांकडून विधीवत विसर्जन केलं जाणार आहे 

विसर्जनसाठी महापालिकेने १३५ कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. तसंच कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या गाड्या कंटेन्मेंट झोन भागात फिरुन विसर्जनासाठी मूर्ती संकलित करणार आहेत 

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच गर्दी टाळण्याच्यादृष्टीने विसर्जनापूर्वीची निरोपाची आरती घरीच करुन आपल्या गणेशमूर्ती महानगरपालिकेच्या मूर्ती संकलन वाहनावरील स्वयंसेवकांकडे द्याव्यात, असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.


हेही वाचा -

Ganpati Festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन

आश्चर्य! गणेशोत्सवात पहिल्यांदाच लालबाग, परळ शांत


पुढील बातमी
इतर बातम्या