पुरातन शिवमंदिरात अवतरला घरगुती बाप्पा

मुंबईतील गणेशोत्सवाची वेगळीच ओळख जगभरात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवात वेगवेगळे सामाजिक विषय, पुरातन मंदिर यांसारख्या अनेक विषयांवर गणेशभक्त देखावा सादर करतात. विशेषत: सार्वजनिक गणेश मंडळं आकर्षक देखावे सादर करत असून, बहुतांश गणेशभक्त हे घरगुती बाप्पासाठी देखील अशाप्रकारची सजावट करतात. अशाच मुंबईतील एका गणेश आपल्या घरच्या बाप्पासाठी पुरातन शिवमंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

दक्षिण मुंबईच्या प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या नानी वेमुला या गणेशभक्तानं आपल्या घरच्या बाप्पासाठी पुरातन शिव मंदिराचा देखावा सादर केला आहे. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून हे पुरतान शिवमंदिर बनवलं आहे. या सजावटीसाठी लाकूड, पुठ्ठा, सुतळ, पेपर, रशी यांचा वापर केल्याची माहिती नानी वेमुला यानं दिली. विशेष म्हणजे वेमुला परिवारानचं ही सजावट केली आहे.

हेही वाचा - यंदा कोरोना योद्ध्याच्या रुपात अवतरले बाप्पा!

'यंदा आमच्या बाप्पाचं २५ रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं काहीतरी वेगळं करायचा निर्णय परिवारानं घेतला. प्रत्येक गणेशोत्सवात आम्ही सामाजिक विषयांवर सजावट करतो. परंतु, यंदा २५ वे वर्ष असल्यानं पुरतन शिवमंदिर बनवलं', असं नानी वेमुला यांनी सांगितलं.

हेही वाचा - कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात तब्‍बल ५७.७६ टक्‍के वाढ

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सामाजिक विषयांवर सजावट करतात. समाजात घडणाऱ्या घडामोडींची नागरिकांना माहिती देण्याचा प्रयत्नही अनेकदा या मंडळांकडून केला जातो. परंतु, यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्यानं साधेपणानं साजरा केला जात आहे. अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द करण्यात निर्णय घेतला तर, काहींनी दीड दिवस ठेवून बाप्पाला निरोप दिला.


हेही वाचा -

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

१६ रुग्णालयांवर केडीएमसीची कारवाई, कोरोना रुग्णांकडून अधिक बिल आकारलं


पुढील बातमी
इतर बातम्या