चिकन विंग्स चॅलेंजसाठी तयार आहात?

तुम्हाला चिकन खायला आवडत असेल तर तुमच्यासाठीच ही स्पेशल ट्रिट आहे. कारण मुंबईत पहिल्यांदाच 'द चिकन विंग्स फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं आहे. 'द सोशल पिल' आणि 'बिरा ९१' यांनी एकत्र येत या फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे.

'द विंगमॅन ऑफ द इयर'

द चिकन विंग्स फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला एक चॅलेंज देण्यात येईल. याअंतर्गत तुम्हाला झणझणीत असे चिकन विंग्स झटपट म्हणजेच कमीत कमी वेळेत संपवायचे आहेत. तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केलंत तर तुम्हाला बक्षीस देण्यात येईल. यासोबतच आणखी एक टास्क तुम्हाला इथं करायचा आहे आणि तो म्हणजे ऑर्डर केलेल्या चिकन विंग्सचा एक फोटो काढायचा आहे. हा फोटो तुम्हाला #WhatTheCluck या हॅशटॅग अंतर्गत इन्स्टाग्रामवर अपलोड करायचा आहे. यासोबतच तुम्ही चिकन विंग्सचा आनंद घेत असलेल्या आऊटलेट्सला, द सोशल पिल (The Social Pillआणि बिरा ९१ (Bira 91)ला टॅग करायचं आहे. त्यानंतर चिकन विंग्स अपलोड केलेला फोटो तुम्हाला आऊटलेटमध्ये सर्व्ह करणाऱ्याला दाखवायचा आहे. असं करणाऱ्या पहिल्या ५० जणांना बिरा पाईंट फ्री देण्यात येतील.

चिकन विंग्स स्पेशालिटी

  • स्पॅनिश विंग्स, लिटिल डोर
  • स्मोक्ड चिकन विंग्स, प्ले द लाऊंज
  • बार्बिक्यू जर्क चिकन विंग्स, रास्ता बॉम्बे
  • हनी गार्लिक चिकन विंग्स, आऊट ऑफ द ब्ल्यू
  • फोर्थ ऑफ जुलै बार्बिक्यू विंग्स, द लिटिल इजी

चॅलेंज जिंकणाऱ्यांना बक्षीस

१) विंगमॅन ऑफ द इयर ट्रॉफी

२) चिकन विंग्स

३) फ्री बिरा

कधी आणि कुठे?

२८ आणि २९ जुलै असे दोन दिवस हा फेस्टिव्हल रंगणार आहे. खाली दिलेल्या आऊटलेटमध्येच हा फेस्टिव्हल भरणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही लिंकवर The Chicken Wings Fest 2018 या त्यांच्या पेजला भेट द्या.

  • रास्ता बॉम्बे, खार
  • आऊट ऑफ द ब्ल्यू, खार
  • द लिटिल इजी, वांद्रे
  • द लिटिल डोर, अंधेरी
  • प्ले द लाऊज, लोअर परेल

तुम्ही हे चॅलेंज स्विकारलं असेल तर मग या फेस्टिव्हला नक्की भेट द्या. मला खात्री आहे की तुम्ही धमाल कराल. 


हेही वाचा

शाकाहारींसाठी 'व्हेज ट्रिट'

प्रकृतीसाठी बीअरचे फायदे


पुढील बातमी
इतर बातम्या