शाकाहारींसाठी 'व्हेज ट्रिट'


शाकाहारींसाठी 'व्हेज ट्रिट'
SHARES

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी खूप ऑप्शन असतात. पण आमच्यासारख्या व्हेज खाणाऱ्यांचं काय ? आम्हाला जास्त काही पर्यायच नसतात. व्हेज खाणाऱ्यांचं हे रडगाणं आपण अनेकदा ऐकलं असेल. पण आता व्हेज खाणाऱ्यांची पण चांगली चंगळ होणार आहे. कारण व्हेज खाणाऱ्यांसाठी देखील एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. घाटकोपरमध्ये व्हेज एक्स्प्रेस हे नवं रेस्टॉरंट तुमच्या भेटीला आलं आहेव्हेज 'पॅरेडाईज'

आदित्य सावंत आणि अमोलिका सावंत या दोघांनी या रेस्टॉरंटची सुरुवात केली. बॉम्बे हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंटचा एक भाग असलेलं हे रेस्टॉरंट यावर्षी एप्रिलमध्ये सुरू झालं अाहे. भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही प्रकारचं फास्ट फूड येथे मिळतं. हे रेस्टॉरंट स्वच्छता आणि कार्यपद्धतीसाठी अधिक ओळखलं जातं


'व्हेज एक्स्प्रेस'ची खासियत

विगन (नॉन-डेअरी) आणि जैन पदार्थ देखील इथं मिळतात. याशिवाय वेगवेगळे सूप्स, लोकल स्ट्रीट फूड, डंम्पलिंग, पिझ्झा, कॉम्बो, सिजलर्स आणि शेक्स याचा आस्वादही तुम्ही घेऊ शकता. याशिवाय पिझ्झा आणि पास्ता हे हटके कॉम्बिनेशन तुम्ही इथं ट्राय करू शकता. अनेकदा पिझ्झा खायचा की पास्ता हा प्रश्न अनेकदा पडतो. पण इथं तुम्हाला पास्ता पिझ्झा सर्व्ह केला जाईल

तुम्हाला चाट खायला खूप आवडत असेल तर राजस्थानी राज कचोरी हा प्रकार तुम्ही ट्राय करा. यामध्ये आंबट-गोड चटणी, दही, शेव टाकलेली कचोरी तुम्हाला नक्कीच आवडेल. मध आणि चिली सॉसमध्ये बटाटे टोस्ट केले जातात. याची आंबट गोड चव तुमच्या जिभेवर रेंगाळेल हे मात्र नक्की.सो, तुम्हाला व्हेजमध्ये काही वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्कीच व्हेज एक्स्प्रेस या रेस्टॉरंटला भेट द्या आणि इथल्या हटके पदार्थांचा आस्वाद घ्या


कुठे - आर. सिटी. मॉल, घाटकोपरहेही वाचा

कांदिवलीकरांना घेता येणार 'द बन बिस्ट्रो'चा आस्वाद


संबंधित विषय