मुंबईत घ्या मॅक्सिकन फेस्टचा आनंद

मॅक्सिकन फूड खाण्याची इच्छा होतेय? मग लोअर परळमध्ये आयोजित केलेल्या 'जिको' (xico) फेस्टिव्हलला नक्की भेट द्या. 'सिंको दे मायो' असं या फेस्टिव्हलचं नाव आहे

फेस्टिव्हलची खासियत काय?

या फेस्टिव्हलची खासियत म्हणजे तुम्ही इथं वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकताग्वकमोली, फ्लॉताज, एमपॅनडाज, टाकोज, टोस्टादासकॅसेदियाज आणि पॅस्टले असे मॅक्सिकन पदार्थ चाखण्याची संधी तुम्हाला या फेस्टिव्हलमध्ये मिळेल. खाण्यासोबतच तुम्ही इथं वेगवेगळ्या मॅक्सिकन ड्रिंकचा आनंद घेऊ शकता. मार्गरिटा, पलोमाज, कॉकटेल या ड्रिंक नक्कीच तुमच्या पसंतीस उतरतील.  

कुणाची संकल्पना?

आशियातील टॉप बारटेंडर पिटर चुआमायकल कॅलहान आणि अर्जित बोस हे तिघे देखील या फेस्टिव्हलला हजेरी लाणार आहेत. सिंगापूरमध्ये '२८ हाँक कॉंग स्ट्रीट' हे रेस्टॉरंट उभारण्यामागे या तिघांचाच हात आहे. हे रेस्टॉरंट जगात ५० व्या स्थानी आणि आशियातील ५० बेस्ट बारमध्ये चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय खाण्या-पिण्यासोबतच तुम्हाला डांस फ्लोअरवर थिरकण्याची संधी देखील मिळणार आहे. डिजे एट्रिन याच्या तालावर नक्कीच तुमचे पाय थिरकतील. त्यामुळे हा फेस्टिव्हल नक्कीच तुमचा विकेंड मार्गी लावेल

कुठे - जिको (Xico), ट्रेड व्ह्यू बिल्डींग, कमला मिल, लोअर परळ

कधी - ५ मे २०१८

वेळ - ८ वाजल्यानंतर

संपर्क - ८०९७८७९४४


हेही वाचा-

तुम्हाला चीझ खायला आवडतं? मग या फेस्टिव्हलला भेट द्या!

पुढील बातमी
इतर बातम्या