Advertisement

तुम्हाला चीझ खायला आवडतं? मग या फेस्टिव्हलला भेट द्या!

मुंबईकरांचं चीझ प्रेम ओळखून 'द भुक्कड फ्ली'नं चीझ मुंबईचं आयोजन केलं आहे. यात तुम्हाला चीझचा वापर करून बनवलेले एकाहून एक पदार्थ चाखता येणार आहेत. वेगवेगळ्या शहरांमधून ५० शेफ आणि बेकर्स चीझी मुंबई या फेस्टिव्हलसाठी हजर राहणार आहेत.

तुम्हाला चीझ खायला आवडतं? मग या फेस्टिव्हलला भेट द्या!
SHARES

भैया, थोडा जादा चीझ डालना! दाबेली, रोल, सँडविच, डोसा असो किंवा पिझ्झा..चीझ इज मस्ट! चीझवर असलेलं खवय्यांचं हेच प्रेम लक्षात घेता पहिल्यांदाच 'चीझी मुंबई'  या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.


सौजन्य

चीझी मुंबई...

चीझवर मुंबईकरांचं किती प्रेम आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. कॉलेज तरूणांमध्ये तर चीझची प्रचंड क्रेझ! मुंबईतल्या पदार्थांमध्ये चीझ फॅक्टर हा कॉमन झाला आहे. वडापाव, डोसा, मॅगी एवढंच काय, तर पाणीपुरी आणि शेवपुरी अशा एकूण एक पदार्थांमध्ये चीझचा वापर केला जातो. मुंबईकरांचं चीझ प्रेम ओळखून 'द भुक्कड फ्ली'नं चीझ मुंबईचं आयोजन केलं आहे. यात तुम्हाला चीझचा वापर करून बनवलेले एकाहून एक पदार्थ चाखता येणार आहेत. वेगवेगळ्या शहरांमधून ५० शेफ आणि बेकर्स चीझी मुंबई या फेस्टिव्हलसाठी हजर राहणार आहेत.



हेही वाचा : मुंबईतल्या रेस्टॉरंट आणि कॅफेत मँगो मेनियाची लाट!


फक्त एवढंच नाही, तर खाण्यासोबतच तुम्ही अनेक गेम्सचा आनंद देखील घेऊ शकता. सेल्फी बुथ, वुमन स्पा, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी काही गेम्स असं बरचं काही तुम्हाला इथं अनुभवता येणार आहे. चीझ कसं बनवलं जातं? याचा व्हिडिओ देखील दाखवला जाणार आहे. एकूणच चीझी मुंबई हा फेस्टिव्हल मजेशीर असेल यात काही शंका नाही!


सौजन्य

कधी आणि कुठे?

26 आणि २७ मे असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत तुम्ही चीझी मुंबई या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकता. हा फेस्टिव्हल कुठे आयोजित करण्यात येईल याविषयी अजून माहिती देण्यात आलेली नाही. पण स्थळ निश्चित झाल्यावर नोंदणी केलेल्या सर्वांना ते कळवण्यात येईल. चीझी मुंबईमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर नोंदणी करणं आवश्यक आहे. https://goo.gl/forms/H3WA2X251qUYc3EE3 या लिंकवर तुम्ही नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी 9833984214 या नंबरवर संपर्क साधू शकता.



हेही वाचा

चटकदार पाणीपुरीचा आस्वाद घ्या या फेस्टिव्हलला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा