Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

चटकदार पाणीपुरीचा आस्वाद घ्या या फेस्टिव्हलला

फक्कड खवय्यांना अशा वेगवेगळ्या आणि भन्नाट पाणीपुरीचे प्रकार एकाच ठिकाणी खायला मिळाले तर? तर काय, नक्कीच सर्व तुटून पडतील! मुंबईकरांचं पाणीपुरीवरचं प्रेम ओळखून घाटकोपरमध्ये तीन दिवस पाणीपुरी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.

चटकदार पाणीपुरीचा आस्वाद घ्या या फेस्टिव्हलला
SHARES

आंबट, गोड आणि तिखट या तिन्ही चवींचं मिश्रण असलेली पाणीपुरी म्हणजे एक भन्नाट प्रकार! पाच वर्षांच्या पोरापासून ते सत्तरी गाठलेल्या आबाल-वृद्धालाही आपल्या चवीशी बांधून ठेवणारा. तसं पाहायला गेलं, तर पाणीपुरी हा पदार्थ महाराष्ट्राचा नाही. पण तरीही या पाणीपुरीनं वर्षानुवर्ष इथं बस्तान बसवलं आहे. वेगवेगळ्या शहरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पाणीपुरीची खासियत देखील वेगवेगळीवेगवेगळ्या भागाची चव जपणारी ही पाणीपुरी खायला कुणाला नाही आवडणार?

via GIPHY

">

via GIPHY

कधी तरी मूड झाला तर किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'एक प्लेट पाणीपुरी होऊन जाऊ दे' असं म्हणत आपण रस्त्यावर विक्रीस असलेल्या पाणीपुरींवर ताव मारतो. जर एकदा चटक लागली की मग एक प्लेट काय? नी दोन प्लेट काय? एकावर एक पुऱ्या गटवल्या जातात. पण समजा अशा फक्कड खवय्यांना अशा वेगवेगळ्या आणि भन्नाट पाणीपुरीचे प्रकार एकाच ठिकाणी खायला मिळाले तरतर काय, नक्कीच सर्व तुटून पडतील! मुंबईकरांचं पाणीपुरीवरचं प्रेम ओळखून घाटकोपरमध्ये तीन दिवस पाणीपुरी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.


पाणीपुरी फेस्टिव्हलची खासियत

या फेस्टिव्हलमध्ये पाणीपुरीचे जबराट प्रकार पाहायला मिळणार आहेत. असे प्रकार जे सध्याच्या खाद्यसंस्कृतीसोबत फ्युजन असतील. जसं की पिझ्झा पाणीपुरी. पिझ्झा आणि पाणीपुरी हे दोन वेगळे पदार्थ आहेत. पण खवय्यांना काही तरी वेगळं आणि भन्नाट देण्यासाठी या दोन्ही पदार्थांचा मिलाप केला आहे. यानंतर आईस पाणीपुरी देखील तुम्ही ट्राय करू शकता. हे काय कमी होतं त्यात आणखी एक पाणीपुरीचा विचित्र प्रकार अॅड होतो आणि तो म्हणजे पाव भाजी पाणीपुरी.

हे तर काहीच नाही, पाणीपुरीच्या प्रकाराची मोठी लिस्टच इथे आहे. चीझ पाणीपुरी, मँगो पाणीपुरी, खाऊगल्ली पाणीपुरी, चॉकलेट पाणीपुरी असे प्रकार चाखायची संधी मिळणार आहे. तुम्ही इथं पाणीपुरी खाण्यासोबतच स्पर्धेचा अनुभव देखील घेऊ शकता. स्पर्धा...तीपण काही साधीसुधी नाही, तर पाणीपुरी खाण्याची स्पर्धा!

कधी? - ४, ५ आणि ६ मे

कुठे? - आर सिटी मॉल, घाटकोपर

वेळ? - संध्याकाळी ५ वाजल्यानंतरहेही वाचा

नॉन-व्हेज, चॉकलेट आणि टेस्ट ट्यूब पाणीपुरी!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा