Advertisement

मुंबईतल्या रेस्टॉरंट आणि कॅफेत मँगो मेनियाची लाट!

मँगो सीजन सुरू आहे म्हटल्यावर रेस्टरंट, पब, कॅफेमधल्या मेन्यूमध्ये मँगोपासून बनवलेले पदार्थ हमखास दिसतात. आंबा तोच, पण त्याचे अनेक प्रकार पाहून तुम्ही देखील चक्रावून झाल. आंब्याची मूळ चव कायम राखत रेस्टॉरंट, पब आणि कॅफे हे नानाविध प्रयोग करतात. असाच एक वेगळा प्रयोग बीबीसी म्हणजेच ब्रिटिश ब्रुईंग कंपनीच्या आऊटलेटमध्ये करण्यात आला आहे.

मुंबईतल्या रेस्टॉरंट आणि कॅफेत मँगो मेनियाची लाट!
SHARES

मुंबईत सध्या सगळ्यांना मँगो मेनिया झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीजिथे बघावं तिथे मँगो फेस्टिव्हल पाहायला मिळत आहे. एप्रिल-मे महिना आंब्याचा सीजन असल्यानं सर्वच जण आंब्यालाच अधिक पसंती देतात. त्यामुळे या दोन महिन्यात आंब्याचा भाव मात्र सर्व फळांमध्ये जास्तच वधारलेला असतो. आता मँगो सीजन सुरू आहे म्हटल्यावर रेस्टरंट, पब, कॅफेमधल्या मेन्यूमध्ये मँगोपासून बनवलेले पदार्थ हमखास दिसतात. आंबा तोच, पण त्याचे अनेक प्रकार पाहून तुम्ही देखील चक्रावून झाल. आंब्याची मूळ चव कायम राखत रेस्टॉरंट, पब आणि कॅफे हे नानाविध प्रयोग करतात. असाच एक वेगळा प्रयोग बीबीसी म्हणजेच ब्रिटिश ब्रुईंग कंपनीच्या आऊटलेटमध्ये करण्यात आला आहे.


मुंबईकरांसाठी खास मेन्यू!

मुंबईकरांसाठी बीबीसीनं आपल्या मेन्यूमध्ये मँगोपासून बनवण्यात आलेले काही खास पदार्थ समाविष्ट केले आहेत. बहुतांश भारतीय पदार्थांसोबत मँगो पेअर केला जातो. पण इथं मँगोचं पेअर परदेशी पदार्थांबरोबर केलेलं पाहायला मिळेल. उदाहरणार्थ मार्गारिटा मँगो पिज्जा, टँगी अल्फ्रेडो मँगो पास्ता आणि थाय मँगो सलाड असे जबराट पदार्थ इथे चाखता येणार आहेत. काय वट आहे ना आपल्या आंब्याचा! थेट परदेशातल्या पदार्थांमध्ये आंब्याची एन्ट्री झाली आहे.



फक्त एवढंच नाही, तर मँगो फ्लेवर्सचं कॉकटेल देखील इथं उपलब्ध आहे. स्पाईक्ड मँगो मिशलँडा हे ड्रिंक तुम्ही ट्राय करू शकता. टकिला, मँगो प्युरी आणि बीअर यापासून स्पाईक्ड मँगो मिशलँडा बनवण्यात येतो. मँगो मार्गरिटा हे ड्रिंक टकिला, लाईम ज्यूस आणि मँगो ज्यूस यापासून बनवलं जातं. मँगो आणि बेजिल मार्टिनी हे ड्रिंक तुळशीची पानं, वोडका, लाइम ज्यूस, साखर आणि मँगो कॉकटेल यापासून बनवण्यात येतं.



जर तुम्हाला नॉन अल्कोहॉलिक ड्रिंक ट्राय करायचं आहे, तर तुम्ही मँगो वर्जिन मोजिटो ट्राय करू शकता. याशिवाय तुम्ही मँगो मिल्कशेक, मँगो चीजकेक याचा देखील आस्वाद घेऊ शकता.

सो तुम्हाला देखील मँगोपासून बनवलेले हे हटके पदार्थ ट्राय करायचे असल्यास एकदा तरी बीबीसीला भेट द्या. आंबा प्रेमींसाठी ही दावतच आहे!

कुठे? - बीबीसीपलेडियमहाय स्ट्रीट फिनिक्स (लोअप परेल)

टाइम्स स्क्वेअर टेक पार्क, (अंधेरी)

ओबेरॉय मॉल (गोरगाव)

विवयाना मॉल (ठाणे)

संपर्क - ०२२३९६९८१९०

वेळ - दुपारी १२ ते रात्री १२



हेही वाचा

आंबा कसा ओळखाल? काय काळजी घ्याल?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा