हंगर की बजा डालो...

सकाळी निघताना आपण पोटभर नाष्टा करतो आणि घराबाहेर पडतो. पण प्रश्न पडतो तो संध्याकाळचा. संध्याकाळी भूक लागली की आपल्यासमोर काय पर्याय असतात? संध्याकाळचं जाऊदे. मधल्या वेळेत भूक लागली की आपण काय खातो? भेळ, पाणीपुरी किंवा वडापाव नाहीतर भजीपाव यापलीकडे गेलो तर बर्गर किंवा फ्रँकी. भेळ ठिक आहे. पण रोज तेच खाऊन कंटाळा आला की वडापाव, फ्रँकी याकडे आपला मोर्चा वळतो. पण हे किती दिवस खाणार? अशा खाण्याचा आरोग्यावर देखील परिणाम होतो.

पण, आता हे कुठे ना कुठे थांबवले पाहिजे. तेलकट, तूपकट खाऊन वजन तर वाढतंच, पण यासोबत अनेक आजार देखील उद्भवतात. पण आता यासाठी तुमच्याकडे एक पर्याय देखील उपलब्ध झाला आहे आणि तो म्हणजे मनशिशियस ग्रॅनोला.

प्रोटिन्सचा खजिना

'मनशिशियस ग्रॅनोला'मध्ये बदाम, काजू, पिस्ता, अक्रोडरोस्टेड ओट्स आणि मध अशा हेल्थी पदार्थांचा समावेश आहे. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी तर चांगले आहेतच यात काही शंका नाही. डॉक्टर देखील तुम्हाला भूक लागली असेल तर ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये शरीरासाठी आवश्यक प्रोटिन्स आहेत. हाच यातील सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. विशेष म्हणजे हे ग्लुटन फ्री आहे.

तुमच्या भूकेला आधार

रोस्टेड ओट्स, बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड आणि मध हे मिश्रण तुम्ही दुधात किंवा दह्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता. एक बाऊल खाल्लं तरी पुरेसं आहे. मग चार ते पाच तास तुम्ही काही खाल्लं नाही तरी चालण्यासारखं आहे. फक्त नाष्टा म्हणून नाही तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात देखील तुम्ही मनशिशियस ग्रॅनोला ट्राय करू शकता. खरंतर कधीही तुम्ही हे खाऊ शकता. ट्रॅफिकमध्ये अडकलेला असाल, मिटिंगमध्ये असाल किंवा प्रावासात असाल कधीही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला याची टेस्ट देखील आवडेल याची खात्री आहे.

मनशिशियस ट्राय करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. फ्लिपकार्ट, अॅमेजॉनपेटिएम या साईट्सवरून तुम्ही ऑर्डर देऊ शकता.


हेही वाचा-

डार्क चॉकलेट चवीला कडू पण आरोग्यासाठी गोड


पुढील बातमी
इतर बातम्या