Advertisement

डार्क चॉकलेट चवीला कडू पण आरोग्यासाठी गोड


डार्क चॉकलेट चवीला कडू पण आरोग्यासाठी गोड
SHARES

चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात, लहान मुलांनी जास्त चॉकलेट खाऊ नये, असा ओरडा लहान मुलांना मिळतच असतो. पण मुलांना चॉकलेट खायला खूप आवडतं. मुलांनाच कशाला मोठ्यांनाही चॉकलेट्स आवडतात. लहान असो वा मोठी माणसं चॉकलेट म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण. पण तुम्हाला माहित आहे का? आवड म्हणून नाही तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर असते. तुमचा विश्वास बसत नसेल. पण हे मी नाही तर अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे



चॉकलेट हे मुळात कोकोपासून बनते. थेओब्रोमाइन हा डार्क चॉकलेटमधील एक महत्त्वाचा घटक आहे. कोकोच्या बियांपासून हा रासायनिक घटक मिळतो. डार्क चॉकलेटमध्ये अँडिऑक्साइड्स मोठ्या प्रमाणात असतात. डार्क चॉकलेटमध्ये कॉपर, मँगनीज, लोह, पोटॅशिअम या खनिजांचा आणि जीवनसत्वांचा मोठा साठा आहे. यामुळेच डार्क चॉकलेट आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.

मी डार्क चॉकलेटबद्दल बोलतेय हे लक्षात ठेवा. चॉकलेट आणि डार्क चॉकलेट यात फरक आहे. डार्क चॉकलेट काही प्रमाणात कडू लागतं. पण ते तुमची चॉकलेट खाण्याची इच्छा तात्पुरती का होईना पण पूर्ण करते. जर तुम्ही थोड्या प्रमाणात खाल्लं तर शरीरासाठी डार्क चॉकलेट फायद्याचं आहे.


  • डार्क चॉकलेटमध्ये साखर, कोको बटरकोको सॉलिड आणि दूध यांची मात्रा कमी असते. डार्क चॉकलेट चवीला जरी कडू असले तरी ते शरीरासाठी अँटी ऑक्सिडंटचं काम करते. १०० ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये ७० ते ८० टक्के कोको असते.
  • योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होऊन रक्तप्रवाह सुरळीत होतोत्यामुळे रक्तातील गुठळ्यांची समस्याही दूर होते.
  • डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे हृदयातील रक्तप्रवाह वाढतोत्यामुळे शरीराला हृदय आणि मेंदू यातील समतोल राखण्यास मदत होतेत्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.



  • डार्क चॉकलेटमधील फ्लॅओनॉइड्स शरीरातील इन्सुलिनची पातळी व्यवस्थित ठेवण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे तुमचा मधुमेह आटोक्यात राहील.
  • तणाव कमी करण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्यानं तणाव कमी होतो.
  • अमेरिकेत करण्यात आलेल्या संशोधनानुसार, रोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्यानं मानसिक स्वास्थ चांगलं राहतं आणि स्मरणशक्ती वाढते.


  • डार्क चॉकलेटमध्ये अँन्टीऑक्सिड्स मोठ्या प्रमाणात असतं. त्यातील रॅडीक्लसमुळे चेहऱ्यावर  सुरकुत्या येत नाहीत.
  • डार्क चॉकलेटचा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातील रसायन कर्करोग होण्यापासून शरीराचा बचाव करतं.
  • कोकोच्या बियांपासून तयार होणारा थेओब्रोमाईन हा चॉकलेटमधील एक महत्त्वाचा रासायनिक घटक आहे. या रासायनिक घटकामुळे दात किडत नाहीत. शिवाय थेओब्रोमाईन हे कफ आणि सर्दीसाठीही गुणकारी असते.



हेही वाचा

चॉकलेटचे झाड!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा