Advertisement

चॉकलेटचे झाड!


चॉकलेटचे झाड!
SHARES

ऑल यू नीड इज लव्ह बट अ लिटिल

चॉकलेट नाऊ अँड देन डझन्ट हर्ट

- चार्ल्स एम. शुल्झ

असा महिमा असणारे चॉकलेट रागात, प्रेमात, भांडणात, एखादा क्षण साजरा करण्यात, एकटेपणात अगदी आजारापणात सुद्धा 'कुछ मिठा हो जाए' असं म्हणत आपण सर्वच आवडीनं खातो... लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचं हे चॉकलेट जगामध्ये अधिक खपलं जातं. पण सर्वांच्या आवडिचं हे चॉकलेट नेमकं आलं तरी कुठून? आकाशातून तर नाही पडलं. मग नेमका याचा शोध लागला तरी कसा? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असतील.


चॉकलेट आलं तरी कुठून?

बरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी ऐवढंच देईन की चॉकलेट आकाशातून नाही पण झाडावरून पडलं आहे. हो अगदी बरोबर ऐकलं आहे तुम्ही. नाही म्हणजे आता आपण जे चॉकलेट खातो त्या स्वरूपात नाही. सर्वात आधी हे फळ कोकोच्या झाडावर बघितलं गेलं. यासंदर्भात देखील अनेक कथा आहेत. कुणी म्हणतं, मेसोमेरीकन्स जे आत्ताच्या मेक्सिकोच्या परिसरात राहायचे त्यांनीच सर्वात प्रथम कोकोची लागवड इ. . पूर्व 350 च्या आसपास केली


तर कुणी म्हणतं दक्षिण अमेरिकेतल्या अॅमेझॉनमध्ये हे झाड प्रथम आढळले. याचा एक संदर्भ माकडांशी देखील जोडला गेला आहे. माकडांनी कोको पॉडमधील गर खाऊन बिया खाली फेकून देत. त्यामुळे पुढे जाऊन त्या बियांपासून कोकोचे झाड उगवले. त्यामुळेच अॅमेझॉनच्या जंगलात कोकोची झाडं अधिक प्रमाणात आढळतात.


शाही चॉकेलट पेय

चॉकलेटसाठी अत्यावश्यक घटक असलेली कोको बीन ही पूर्ण सुकवलेली बी असते. त्यात गोड, लगद्यासारखा गर असतो. यातील बिया पांढऱ्या असतात.सुकताना जांभळा आणि लालसर रंग येतो.आता वेगवेगळ्या रूपात मिळणारं हे गोड चॉकलेट सुरुवातीला कडू स्वरूपात होते

कोको बिन्सना आंबवून भाजून त्याची पेस्ट केली जायची. त्यात पाणी, व्हॅनिला,मध,मिरच्या आणि इतर मसाले घालून त्याचे पेय बनवले जायचे. पूर्वी काही भागात याला शाही पेय समजलं जायचं. याचा उपयोग केवळ काही विशिष्ट कार्यक्रमात केला जायचा.


देवाचं वरदान कोको

प्राचीन काळी कोको याला देवाचं एक वरदान समजलं जायचं. लोक याची पूजा करायचे आणि त्याला देवाचे जेवण म्हणून सन्मान करायचे. त्यामुळे आधीच्या काळात चॉकलेट असं कोणीही खाऊ शकत नव्हतं. प्राचीन माया सभ्यतेनुसार चॉकलेट हे केवळ शासक, योद्धा,पुजारी आणि उच्चस्तरावरील लोक फक्त या चॉकलेटचा आस्वाद घेऊ शकत होते.  यांनाच फक्त चॉकलेटचा वापर करण्याचा अधिकार होता. जर कुठल्या इतर व्यक्तीनं त्याचं सेवन केलं तर त्याला माया समाज कठोर दंड द्यायचा


चॉकलेटचे चलन

चौदाव्या शतकात मुद्रा म्हणून कोकोचा वापर केला जायचा. याची देवाण घेवाण करून वस्तूंची विक्री व्हायची. तीस कोको बियांना एक ससा आणि एका बीला एक टोमॅटो विकत मिळत असे.



चॉकलेटची लोकप्रियता

सोळाव्या शतकापर्यंत युरोपियन लोकांना चॉकलेटच्या अस्तित्वाचीसुद्धा खबर नव्हती. स्पॅनिश लोकांनी चॉकलेट युरोपात आणलं. चॉकलेटमध्ये मध किंवा साखर घालून त्याला गोड करण्याचं श्रेय त्यांनाच जातं. हळूहळू इतर देशांमध्ये त्याची लोकप्रियता वाढू लागली.


चॉकलेटची पहिली कंपनी

१७६० साली स्थापन झालेली 'चॉकलेट लॉम्बार्ट' ही फ्रान्समधली चॉकलेट बनवणारी पहिली कंपनी म्हणून ओळखली जाते. पण त्यावेळी या कंपनीत चॉकलेट हे पेय स्वरूपातच होते. १८४७ साली 'जे. एस.फरी अँड सन्स' या ब्रिटिश कंपनीनं पहिला चॉकलेट बार तयार केला.


चॉकलेटवर आधारित म्युझियम

अमेरिकेतील हर्शीज चॉकलेट वर्ल्ड आणि ऑरलँडो वर्ल्ड ऑफ चॉकलेट अँड म्युझियम ही दोन संग्रालयं फक्त चॉकलेटसाठी वाहिलेली आहेत. यात चॉकलेटचा संपूर्ण इतिहास अधोरेखीत करण्यात आला आहे.



हेही वाचा

तुम्ही कटिंग डिझर्ट ट्राय केलंत का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा