Advertisement

वेळेत जेवा नाहीतर होतील 'हे' आजार!

सध्याच्या जीवनशैलीमध्ये खाण्याच्या वेळा पाळणं आपल्याला कठीण वाटू लागलं आहे. शिवाय, इतर कामांना इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे, की जेवणासाठी वेळच मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आपली इतर कामं जरी वेळेवर होत असली, तरी वेळी-अवेळी जेवल्यामुळे आपण अनेक आजारांचे धनी होत असतो. आपल्या नकळत...

वेळेत जेवा नाहीतर होतील 'हे' आजार!
SHARES

निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी आपण डाएट, हेल्दी फूड, जिम, योगा अशा सर्व गोष्टींना प्राधान्य देतो. पण जर आपण वेळेत जेवत नसू, तर ते तुमच्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरू शकतं. वेळेवर जेवत जा रे, असं घरातली वडीलधारी मंडळी सांगत असतातच. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा कामाच्या व्यापातून आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला ते करणं शक्य होत नाही.

या सर्वांचा शरीरावर किती वाईट परिणाम होत असतो याची साधी कल्पनाही आपल्याला नसते. अनेक वेळा असं होतं की, सकाळी उशीरा उठणं होतं त्यामुळे सकाळचा नाष्टा दुपारी, दुपारचं जेवण दोन वाजता किंवा तीन वाजता होतं. त्यात संध्याकाळी काहीतरी अरबट चरबट खाल्ल जातं. एकूणच काय, तर खाण्या-पिण्याच्या सवयींचा बट्याबोळ झालेला असतो. त्यामुळे सकाळचा नाष्टा दहाच्या आत, दुपारचं जेवण एक वाजता आणि रात्रीचं जेवण सात वाजता करणं आवश्यकच आहे.



आयुर्वेदात रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घेणं चांगलं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रात्रीचा काळ हा चार टप्प्यांमध्ये विभागला आहे. निसर्ग चक्र आणि शरीराची सायकल निसर्ग चक्राशी जुळणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात जेवण घ्यावं, त्यामुळे आपली अनेक रोगांपासून सुटका होते. तुम्ही ऑफिसला असाल, वेळ मिळत नसेल तर भाजी-चपाती रोल करून नेता येईल. रात्री ऑफिसमध्ये लेट होणार असेल तर डबा घेऊन जाता येईल. शिवाय तुमच्या जेवणाच्या वेळा एकसमान असाव्यात. म्हणजे रोज साधारणपणे त्याच वेळी दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण व्हायला हवं.


उशीरा जेवणाचे परिणाम

  • उशीरा जेवल्यानं हृदयविकार आणि स्ट्रोक्सचा धोका वाढतो
  • खास करून रात्रीचं जेवण सातच्या सुमारास करणं आवश्यक आहे. नाहीतर लठ्ठपणा वाढतो
  • उशिरा जेवल्यानं स्ट्रेस हार्मोन्स प्रभावित होतात आणि त्याचा शरीरावर ताण पडतो
  • ब्लड प्रेशरची समस्या देखील उद्भवू शकते
  • उशीरा जेवल्यानं अन्न पचत नाही आणि त्यामुळे अपचन, पित्त, झोप न लागणे अशा समस्या निर्माण होतात
  • लैंगिकदृष्ट्या कार्यशीलता कमी होते



लवकर जेवण्याचे फायदे

  • बैठी जीवनशैली, कामाचा ताण आणि इतर अनेक कारणे लठ्ठपणासाठी कारणीभूत असतात. पण रात्रीचे जेवण लवकर केल्यास लठ्ठपणाची समस्या कमी होते.
  • रात्री खूप जास्त खाल्ले, तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुम्ही नीट नाश्ता करू शकत नाही. नाश्ता नीट झाला नाही, तर दिवसभर तुम्हाला निरुत्साही वाटेल. जर तुम्ही रात्री लवकर जेवलात, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पोटभर नाश्ता करू शकाल आणि दिवसभर अंगात ताकद राहील.
  • लवकर जेवण केलं, तर ते अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे गॅसच्या समस्या निर्माण होत नाहीत.



हेही वाचा

वाईट सवयी सोडल्या नाहीत, तर हे वॉच देईल शॉक!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा