पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १९२ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवार (२७ ऑगस्ट) १९२ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कामोठे आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. १९८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ३४, कामोठ्यातील ३९, खांदा कॉलनीतील १०, खारघरमधील ३५, पनवेलमधील ४६,  नवीन पनवेलमधील २६, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ९, कामोठ्यातील २६, खारघरमधील ४२, पनवेलमधील ३२,  नवीन पनवेलमधील ८४, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १०,९६३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ९६५६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०३४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

मिरा-भाईंदरमधील वाढते मृत्यू चिंतेचा विषय


पुढील बातमी
इतर बातम्या