Advertisement

मिरा-भाईंदरमधील वाढते मृत्यू चिंतेचा विषय

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात कोरोनाबाधित रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी दुसऱ्या बाजूला कोरोनामुळे (COVID-19) होणारे मृत्यू स्थानिक प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरू लागले आहेत

मिरा-भाईंदरमधील वाढते मृत्यू चिंतेचा विषय
SHARES

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात कोरोनाबाधित रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी दुसऱ्या बाजूला कोरोनामुळे (COVID-19) होणारे मृत्यू स्थानिक प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरू लागले आहेत. बुधवार २६ आॅगस्ट २०२० रोजी मिरा-भाईंदरमध्ये ११४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना स्थानिक प्रशासनावरील दबावही वाढत आहे.

मिरा-भाईंदर (MBMC) महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात आतापर्यंत ११,८७४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. यापैकी ४०९ कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत या जीवघेण्या आजाराने मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर मागील १४ दिवसांच्या (१२ आॅगस्ट ते २५ आॅगस्ट दरम्यान) आत मिरा-भाईंदरमध्ये ७९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

हेही वाचा- मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांवर

बुधवारी नवीन ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर हा आकडा ११,८७४ वर जाऊन पोहोचला. तर मृतांची संख्याही ४०९ वर गेली. बुधवारी १०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मिरा-भाईंदर शहरात १००६७ रुण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. 

महाराष्ट्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मिशन बिगीन अगेन अंतर्गत स्थानिक बाजारपेठा, माॅल, इतर उद्योगधंद्यांना काही अटी-शर्थींच्या आधारे परवानगी दिली आहे. परंतु लाॅकडाऊन शिथिल केल्यापासून रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. खासकरून ठाणे जिल्ह्यात आणि मिरा-भाईंदर शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे सध्या तरी दक्षतेचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने येथील माॅल, शाॅपिंग काॅम्प्लेक्स बंदच ठेवले आहेत.   

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा