Advertisement

मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांवर

मुंबईतील कोरोना आता नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांवर
SHARES

मुंबईतील कोरोना आता नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील बहुतांशी सर्व वाॅर्डमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याचबरोबर रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी मुंबईत कोरोनाचे १८५४ रुग्ण आढळले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संकेतस्थळावर तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारी मुंबईतील रुग्णांची पूर्ण संख्या उपलब्ध होऊ शकली नव्हती. त्यामुळे मंगळवारच्या उर्वरित रुग्णांची संख्या बुधवारच्या रुग्णसंख्येसोबत जाहीर करण्यात आली.

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ८१ टक्क्यांवर गेला आहे. कोविड सेंटर, पालिकेसह खासगी रुग्णालयात उपलब्ध केलेल्या खाटा यामुळे करोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा घटत आहे. 

मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ३९ हजार ५३२ वर गेली आहे. बुधवारी ७७६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार ७४३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ७५०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १८ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा