Advertisement

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ७६ टक्क्यांहून ८१ टक्क्यांवर गेला आहे. मृत्यूचा आकडा घटत आहे.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर
SHARES

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ७६ टक्क्यांहून ८१ टक्क्यांवर गेला आहे. मृत्यूचा आकडा घटत आहे. मागील एक महिन्यापासून ४० वर असणारा मृत्यूचा आकडा मंगळवारी २० वर आला आहे. सोमवारी १०२५ रुग्णांनी तर मंगळवारी ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८७ दिवसांवर आला आहे. मुंबईत दररोज हजार ते १२०० रुग्ण आढळत आहेत. पण त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. मुंबईत ३१ जुलै रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ७६ दिवसांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७६ होती. हा सरासरी दर आता ८१ टक्क्यांवर आला आहे.

कोविड सेंटर, पालिकेसह खासगी रुग्णालयात उपलब्ध केलेल्या खाटा यामुळे करोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ९१ वर पोहोचली आहे. परंतु यापैकी १ लाख ११ हजार ८ ४ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर केली आहे. त्यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या १८२६३ असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा ७४३९ वर पोहोचला आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ५८७ नवे रुग्ण, ३५ जणांचा दिवसभरात मृत्यू

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा